MarathiDiamond (हिरा)Gold (सोने)

Carat, Karat (कॅरेट) आणि रत्ती (Ratti) यांचा अर्थ आणि फरक

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण कॅरेट ( Carat ) आणि कॅरेट ( Karat ) बद्दल माहिती बघणार आहोत. तसेच रत्ती ( Ratti ) बद्दलही जाणून घेणार आहोत.

मित्रानो, Carat आणि Karat यांचा उच्चार जरी एकसारखा असला तरी हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. बऱ्याच लोकांना कॅरेट नावाचे दोन वेग वेगळे शब्द आहेत हे देखील माहीत नसते. चला तर मग या बद्दल जाणून घेऊया.

Difference Between Carat and Karat
Difference Between Carat and Karat

मित्रांनो, Karat (कॅरेट) हे सोन्याची प्युरीटी म्हणजे शुध्दता मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. आपल्या देशात कॅरेट हे शक्यतो चार प्रकारचे असतात – 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, आणि 14 कॅरेट या Karat (कॅरेट) द्वारे आपल्याला आपण घेतलेले सोने किती शुद्ध आहे ते कळते. तर कॅरेट (Karat) ह्याचा उपयोग सोन्याचं वजन मोजण्यासाठी नाही तर शुध्दता मोजण्यासाठी केला जातो.

तर Carat (कॅरेट) हे, डायमंड म्हणजेच हिऱ्याचे वजन मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. एक कॅरेट (Carat) म्हणजे २०० मिलिग्राम किंवा ५ कॅरेट(Carat) म्हणजे १ ग्रॅम असते.

मित्रांनो, एक कॅरेट हिऱ्याची महत्व खूप आहे व त्याची किंमत बघितली तर कमीत कमी 3 लाख पासून सुरू होते, एवढा एक कॅरेट ची मूल्य असते. ही किंमत हिऱ्याच्या वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते त्यात कॅरेट (Carat) पण खूप महत्वाचे असते.



रत्ती माहिती

Ratti information in Marathi
Ratti Information in Marathi

आता आपण रत्ती बद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, रत्ती हा खूप जुन्या काळातील शब्द आहे. रत्नांचे वजन मोजण्यासाठी वापरले जाणारे हे एकक आहे. रत्ती नावाचे एक रोझरी झाडाचे बी आहे या झाडाच्या प्रत्येक बी चा आकार आणि वजन सारखेच असते त्यामुळे जुन्या काळात वजन करताना एक स्टोन म्हणजे एक रत्ती किंवा पाच स्टोन म्हणजे पाच रत्ती असे मानले जात असे.

म्हणजेच स्टोनचे वजन त्या बी च्या मदतीने मोजले जायचे. या रात्तीचे पण दोन प्रकार पडतात –

  1. एक कच्चा रत्ती
  2. दुसरा पक्का रत्ती.

कच्चा रत्ती असेल तर त्याचे वजन 120 मिलीग्राम इतके मोजली जाते व पक्का रात्तीचे वजन हे अंदाजे 182 मिलीग्राम इतके असते. आपल्या देशात आजही बरेच ठिकाणी पक्का रत्ती वापरले जाते. ज्याचे वजन 182 मिलीग्राम प्रति रत्ती असते. पण हरियाणा ,पंजाब, हिमाचल आणि उत्तरेकडील प्रदेशांमध्ये कच्चा रत्ती जास्त वापरला जातो. ज्याचे वजन 120 मिलिग्रॅम प्रति रत्ती असते.

तर अशाप्रकारे आज आपण Karat, Carat (कॅरेट) आणि रत्ती याबद्दल जाणून घेतले. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद !