पोल्की ज्वेलरी म्हणजे काय | Polki Diamond & Polki Jewelry information in Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आपण (Polki) पोल्की ज्वेलरी बद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण पोल्की ज्वेलरी काय असते, ती कशी बनते, या दागिन्यांची कशी काळजी घ्यायची या बद्दल जाणून घेणार आहोत.
पोल्कीचे दागिने हे खूप आकर्षक आणि उठावदार असतात. बऱ्याच जणांना पोल्की व कुंदन हे सारखेच वाटतात पण तसे नाही, पोल्की आणि कुंदन मध्ये बराच फरक आहे, शिवाय हे पोल्कीचे दागिने कधीच जुने नाही होत. त्यांच्या नैसर्गिक चमक आणि सौंदर्यामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
महिलांना दागिने घालण्याची खूप आवड असते, पण या दागिन्यांमध्ये ही काहीतरी वेगळेपणा त्यांना हवा असतो. शक्यतो लग्नसमारंभात, सणासुधीमध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे नवीन प्रकारचे दागिने घेतले जातात, तर अशावेळी तुम्ही पोल्की दागिन्यांचा विचार करू शकता.
चला तर मग या पोल्की बद्दल अधिक जाणून घेऊया.
What is Polki
पोल्की म्हणजे काय
मित्रांनो, पोल्की हा एक भारतीय शब्द आहे. पोल्की हे एक प्रकारचे हिरे आहेत. तुम्हाला माहीत आहे की हिरे नैसर्गिक रित्या खाणीतून काढले जातात. या खाणीतून काढलेल्या हिऱ्याला वेगवेगळे आकार देण्याऐवजी त्यांचे स्लाइस (काप/ चकत्या) केले जातात व नंतर या स्लाइस ला दागिन्यांमध्ये फिट केले जाते, म्हणजेच हिरांच्या केलेल्या या स्लाईसलाच पोल्की असे म्हटले जाते.
हे पोल्की चे दागिने हिऱ्या पासून तयार केलेली असतात. सोन्याच्या दागिन्यांमध्ये या स्लाइसला सेट करताना याच्यामागे चांदीची एक लेयर टाकली जातो, त्याला डाक बोलतात. या डाकमुळे पोल्कीच्या स्लाइसला थ्री डिमेन्शनल व्हू मिळतो आणि तो पूर्ण हिरा असल्याचा भास तयार होतो. हिऱ्यांमध्ये लाईट रिफ्लेक्शन कॅपॅसिटी जास्त असते त्यामुळे चांदीच्या लेयर मुळे हे पोल्की डायमंड अधिक चमकू लागतात आणि त्यांना एक वेगळी चकाकी येते आणि प्रकाश पडल्यावर हे पोल्की चे दागिने किंवा हिरे खूप चमकू लागतात. त्यामुळे ते खूप आकर्षक दिसतात व त्यांचा एक वेगळाच लुक दिसतो.
पोल्की दागिन्यांमध्ये मध्ये पूर्ण हिरा वापरात नाही तर त्याचे छोटे छोटे पातळ स्लाइस वापरतात त्यामुळे हे दागिने हिरांच्या दागिन्यांच्या मानाने स्वस्त असतात.
कधी कधी वेगळा लूक देण्यासाठी यात रत्ने सुद्धा लावण्यात येतात. जसे की रुबी, सफायर, नीलम, पाचू आणि जेम स्टोन देखील लावण्यात येतात. या स्टोन्स मुळे पोल्की दागिन्यांची डिझाईन वेगळी उठावदार दिसतात. त्यामुळे त्या दागिन्यांना एक क्लासी लूक मिळतो.
पोल्की दागिन्यांसाठी नैसर्गिक हिरा वापरण्याची कला मुघल काळापासून तिथल्या लोकांच्या परंपरांचा भाग म्हणून बऱ्याच वर्षां पूर्वीची आहे.
पोल्की हिरे आता आधुनिक डायमंड कट्ससारखे दिसतात किंवा मिळतात जसे की गोल, प्रिन्सस कट, ब्रिलियंट, कुशन इ.
पूर्वीच्या काळात पोल्कीचा वापर त्यांच्या नैसर्गिक, अनकट स्वरूपात केला जायचा, परंतु आता अनेक दागिने हे हिऱ्याचे स्लाइस करून त्यांना पॉलिश केलेले असतात. यामुळे आता पोल्की चे दागिने अधिक चमकदार दिसतात.
Types of Polki
पोल्कीचे प्रकार
मित्रांनो, पोल्कीचे काही प्रकार पडतात. जसे की सिंडिकेट, झिम्बाब्वे आणि खिलवास हे तीन प्रकारचे पोल्की आहेत. त्यापैकी सिंडिकेट ही उच्च दर्जाची पोल्की मानली जाते.
झिम्बाब्वे पोल्की हे आफ्रिके मधील झिम्बाब्वे मधल्या हिर्यांना समजले जाते. आणि खिलवास हे सर्वात कमी दर्जाच्या पोल्कीस म्हटले जाते.
Value of Polki Diamonds
पोल्की हिऱ्यांचे मूल्य
पोल्की हिऱ्यांची किंमत ही त्याच्या रंग, स्पष्टता वगैरे गोष्टींवर अवलंबून असते.
पोल्की डायमंड निवडताना रंग निवडणे सर्वात महत्वाचे मानले जाते. शक्यतो नैसर्गिक व पॉलिश न केलेले कमी रंगाच्या स्वच्छ पोल्कीस प्राधान्य दिले जाते आणि रंग असलेल्या पोल्कीपेक्षा रंगहीन पोल्कीची किंमत जास्त मिळते.
याशिवाय पोल्की दागिन्यांची स्पष्टता (Clearity) पण खूप महत्वाची असते कारण पोल्की हिर्यांचे मूल्यमापन करताना त्याच्या वजनापेक्षा बहुतेक त्याच्या स्पष्टताला जास्त किंमत मोजली जाते.
पोल्कीचे दागिने खरेदी करताना काय काळजी घ्यावी
मित्रांनो, तुम्ही दुकानात पोल्कीचे दागिने घेता तेव्हा त्या दागिने चे बिल घेण्यास विसरू नका. कारण पोल्की ज्वेलरी मध्ये चांदीचा लेयर दिल्यामुळे त्यावर कधी पाणी पडले किंवा हवेच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ही चांदी काळी पडते व त्या पोल्की डायमंडची चमक जाऊ शकते. ती चमक पुन्हा येण्यासाठी त्या दागिन्याला परत पॉलिश करावे लागते. त्यामुळे बिल असेल तर कमीत कमी किमती मध्ये तुम्हाला दागिना पॉलिश करून मिळतो व तुम्हाला त्याची जास्त किंमत मोजावी लागत नाही.
How to care Polki Jewelry
पोल्की दागिन्यांची काळजी कशी घ्यावी
- पोल्कीच्या दागिन्यांना आगीपासून लांब ठेवावे कारण त्याचा रंग आणि आकारा मध्ये फरक पडून ते खराब होऊ शकतात.
- पोल्की ज्वेलरीचा प्रत्येक दागिना हा वेगळ्या बॅग मध्ये ठेवावा त्यामुळे या दागिन्यांना हवा लागणार नाही.
- पोल्की दागिने घालून परफ्युमचा वापर केल्यास, सोने व चांदीचा लेअर असल्यामुळे तुमचे दागिने काळे पडू शकतात.
- अधूनमधून हे दागिने बाहेर काढा आणि परत स्वच्छ करून ठेवले पाहिजे.
Disadvantages of Polki Jewelry
पोल्की दागिन्यांचे दोष
पोल्कीच्या दागिन्यांमध्ये हिऱ्यांचे स्लाइस असतात, त्यामुळे दागिना जर चुकून पडला तर त्या स्लाइस फुटू (ब्रेक) होऊ शकतात. आणि एकदा फुटल्यावर तो दागिना रिपेअर करणे खुप कठीण असते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आपण पोल्की दागिन्यांबद्दल जाणून घेतले.
धन्यवाद!