MarathiPearl (मोती)

मोती कसा तयार होतो | मोती : इतिहास, किंमत, प्रकार | खरे मोती व बनावटी मोती मधील फरक

नमस्कार मित्रांनो, आज आपण Pearls म्हणजेच मोती बद्दल जाणून घेणार आहोत. यात आपण मोत्याबद्दल सगळी माहिती बारकाईने बघणार आहोत. यात खास करून खरा मोती आणि बनावटी मोती कसा ओळखायचा या बद्दल माहिती. आणि मोती कसा तयार होतो, मोत्याचे प्रकार, मोत्याची किंमत, मोत्याचे फायदे ही बघणार आहोत.

Pearl history pearl formation pearl types price

Pearl : history, pearl formation, pearl types, price , benefits, real or fake

What exactly is a Pearl?

मोती म्हणजे काय ?

मित्रानो, मोती हा कुठलाही खनिज नाही जो खाणीतून काढला जातो. तर तो एक प्राणिजन्य जीवापासून नैसर्गिक किंवा कुत्रिम पद्धतीने तयार होतो. तो जीव पोषणासाठी पाण्यात वाढतो. मोती हा एक जिवंत कवच असलेल्या मोलुस्क सारख्या प्राण्यांच्या मऊ उतींमध्ये म्हणजेच आवरणामध्ये तयार होणारा एक कठीण/ कठोर व चमकणारी वस्तू आहे. मोती हा कॅल्शिअम कार्बोनेट स्फटिकाच्या स्वरूपात बनलेला असतो.

The history of Pearls



मोत्याचा इतिहास

मित्रांनो मोत्याचा इतिहास हा खूप जुना आहे. प्राचीन वांड्मय मध्ये व अथर्ववेदात मोत्याचा उल्लेख केलेला आढळून येतो. तसेच ख्रिस्तपूर्व पंधराशे वर्षांपूर्वी सुद्धा मोत्याचा उल्लेख केलेला दिसून येतो. आर्य संस्कृतीत, ग्रीक संस्कृतीत तसेच रोमचे साम्राज्य असताना मोत्याला खूप महत्त्व असल्याचे दिसून येते. पूर्वी राजघराण्यांमध्ये तर मोत्यांचा वापर सर्रास होत असे. मोत्याची चमक व कठोरता यामुळे त्याला मौल्यवान समजले जात असे. पूर्वी सोन्या पेक्षाही मोत्याला जास्त किंमत होती. तसेच आयुर्वेदात मोत्याला पित्त नाशक व आयुष्य वर्धक असे सांगितले गेले आहे. पूर्वी इराणच्या खानीतून उत्तम प्रकारचे मोती काढले जात असे. तसेच पूर्वीच्या काळी युरोप व इटली च्या देशात मोत्याचे वेगवेगळे दागिने वापरत असे.

How Pearls Form

मोती कसा तयार होतो

मित्रांनो, मोती हा शिंपल्यात कवच असलेल्या मोलुस्क सारख्या प्राण्यांच्या कवच मध्ये तयार होतो. या शिंपल्याची उघडझाप होत असते. शिंपल्याच्या आतील प्राण्याला पेशीमय पाय असतात. व हाच पाय एखाद्या मजबूत कणाला घट्ट चिकटून रोहतो. एखाद्या कणाला चिकटून त्याला शिंपल्यात आणले जाते व त्याभोवती पिशवी तयार होते. याच पिशवीत अडकलेल्या कणा भोवती चिकट पदार्थांचे स्तर किंवा आवरण टाकले जाते व हाच कण नंतर मोती बनतो.

मोत्याची वाढ होताना जर कशाचा दाब त्या कणावर पडला तर मोती ओबडधोबड होतो व जर दाब पडला नाही तर मग त्याचा गोल आकार तयार होतो. काही मोती हे अर्धगोलाकृती सुद्धा असतात काही विशिष्ट परिस्थिती मध्ये व त्यांचा आकार अर्धगोलाकृती होतो साधारणतः मोती हे खाऱ्या व गोड्या पाण्यात तयार होतात.

Types of Pearl

मोत्याचे प्रकार

  1. नैसर्गिक मोती
  2. संवर्धित किंवा कल्चरड (Cultured) मोती
  3. कृत्रिम मोती
Natural Pearls

नैसर्गिक मोती

नैसर्गिक मोती हे गोड किंवा खारट पाण्यात ऑयस्टर द्वारे नैसर्गिक रित्या आवरणात किंवा शिंपल्यात तयार होतात. नैसर्गिक मोती हे कधी कधी गोलाकार किंवा अर्धगोलाकार अश्या वेगवेगळ्या आकारात तयार होतात.

शिंपल्यात एखादा वाळूचा कण किंवा धूळ गेल्यास तेथील चिकट पदार्थाच्या आवरणात मोती वाढत असतो. त्यांना तयार व्हायला साधारणपणे काही वर्ष लागू शकतात. शिवाय मोत्यांचा आकार हा लहान मोठा असू शकतो कारण हे शिंपले पाण्यात तर असतातच शिवाय कधी कधी पाण्याच्या ओघाने बाहेरही येतात त्यामुळे हवे ते पोषण कमी जास्त होते व त्या मोत्यांचा आकार कमी जास्त होतो. तसेच त्यांच्यात पडणाऱ्या दाबामुळे सुद्धा त्यांचा आकार वेगळा होतो. आजच्या काळात मानवी हस्तक्षेपाशिवाय तयार होणारे नैसर्गिक मोती हे आता अत्यंत दुर्मिळ झाले आहेत.

संवर्धित किंवा कल्चरड मोती

संवर्धित मोती तयार करताना शिंपल्यात छोटीशी प्रक्रिया करून न्युक्लिअस ची लागवड केली जाते व तो शिंपला दोन ते तीन वर्ष गोड्या पाण्यात ठेवला जातो. अशा प्रकारे शिंपल्यात शस्त्रक्रियेद्वारे तयार झाल्यामुळे त्याला संवर्धित मोती असे म्हणतात. हा मोती अगदी नैसर्गिक मोत्या सारखा दिसतो. व तेवढयाच गुणवत्तेचा असतो. तयार झालेले हे मोती शिंपल्यातून काढल्या नंतरही त्याच्या वर काही प्रक्रिया केल्या जातात जसे की स्वच्छ करणे आणि रंगीतपणा आणण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. अशा पद्धतीने तयार झालेल्या संवर्धित म्हणजेच खऱ्या मोत्यांना मोठी किंमत मिळते आणि त्यांची मागणी पण खूप आहे.

कृत्रिम मोती

कृत्रिम मोती हे मानव निर्मित मोती आहेत. हे मोती बहुतेकदा काचे पासून, प्लास्टिक पासून किंवा शिंपल्यांच्या कवचां पासून बनवले जातात. नैसर्गिक मोत्यांसारखे स्वरूप देण्यासाठी त्यांना वरून कोटिंग केलेलं असते. हे कोटिंग वाळवून नंतर मोती तयार केला जातो. अश्या प्रकारे तयार केलेल्या मोत्यांवर लावलेले कोटिंग निघू शकते, किंवा त्याचा रंग निघू शकतो व ते मोती फिके पडू शकतात. त्यासाठी त्यांना पुन्हा चमक आणण्यासाठी पॉलिश करावे लागते. हे कृत्रिम मोती, खोटे मोती असतात.

मित्रांनो खाऱ्या पाण्यातील मोती हे चांगल्या प्रतीचे असतात, पण त्यांचे संवर्धन करणे खूप जिकिरीचे असते .

तसेच गोड्या पाण्यातील मोती मिळवणे खूप सोयीस्कर आणि फायदेशीर असते. खार्‍या पाण्याच्या तुलनेत गोड्या पाण्यातीळ मोत्यांचा साठा खूप मोठा दिसून येतो.

How to Tell if Pearls Are Real or Fake

खरा मोती कसा ओळखायचा

मित्रांनो, आपण वेग वेगळ्या प्रकारचे मोती तर बघितले पण खरेदी करताना खरा मोती कसा ओळखायचा ते आता पाहू

मित्रांनो, मोती हा खूप लोकप्रिय आणि महाग आहेत, आणि यामुळे त्यांची नक्कल/बनावट बाजारात मोठया प्रमाणात आहेत. बनावट मोत्यांच्या निर्मितीची प्रगती बघता नकळतपणे बनावट मोती खरेदी करणे समस्या होत चालली आहे. अनेक दुकानदार कडून लोकांना फसवले जात आहे.

चला तर मग, आपण मोती खरे आहेत किंवा बनावटी आहेत हे कसे ओळखायचे याबद्दल जाणून घेउया.

  • खरे मोती नैसर्गिक तयार होतात, त्यामुळे त्याचा आकार, चमक आणि काही प्रमाणात दोष असतात. दोन खरे मोती काही प्रमाणातच सारखे असू शकता. मात्र नकली/बनावटी मोती आकाराने, रंग आणि चमक ने सारखेच असतात.
  • मित्रांनो, खऱ्या मोती मध्ये आणि बनावटी मोती मध्ये बरेच फरक आहेत. नकली मोत्यांना खूप चमक दिली जाते. खऱ्या मोत्यांना तयार होताना काही प्रमाणात थोडी अपूर्णता असते, ज्यामुळे त्यांच्या सर्व भागांवर सारखीच चमक नसते. याशिवाय हे खरे मोती आतून प्रकाशित झाल्या सारखे दिसतात. तर बनावटी मोत्यांचा फक्त पृष्ठभाग चमकतो.
  • बनावटी मोती च्या हारामध्ये सगळे मोती हे एकच आकाराचे किंवा सारखेच गोलाकार दिसतात. तसेच त्यांच्यात कोणतेही दोष दिसत नाही. दुसरीकडे खऱ्या मोत्यांच्या हारा मध्ये प्रत्येक मोती मध्ये काहीतरी वेगळेपण दिसतो. नीट बघितले तर त्यांचा आकारही वेग वेगळा दिसतो. व काही ना काही दोष त्यांच्यात दिसतात.
  • बनावटी मोतींचा रंग हा एकसारखा दिसतो, तर खऱ्या मोत्यांच्या रंगात थोड्या फार प्रमाणात फरक आढळतो. खरे मोती एकमेकांपासून थोडे वेगळे असतात. कारण प्रत्येक मोती हा वेग वेगळ्या शिंपल्या पासून तयार होतो.
  • याशिवाय खऱ्या मोत्यांच्या तुलनेत बनावटी मोती हे वजनाने हलके असतात.
  • खरा मोती ओळखण्याचा अजून एक मार्ग म्हणजे, मोती ला दातावर हळूवार पणे घासावे. जर मोती खरे असतील, तर त्याचे घर्षण होईल आणि जर मोती नकली असेल तर ते गुळगुळीत व मऊ वाटेल. याशिवाय जर मोती खोटा किंवा बनावटी असेल तर दाताखाली थोडा दाबल्यावर त्याचे वरचे कोटिंग निघून जाईल.
  • खऱ्या मोत्या मधील छिद्र खूप लहान असते तर बनावटी मोत्यां मध्ये हे छिद्र अनेकदा मोठे असतात व या छिद्रां भोवतीचा लेअर साधारणपणे पातळ दिसतो व छिद्रा जवळ थोडा सोललेला दिसतो.

मोत्याची किंमत

नैसर्गिक किंवा संवर्धित मोत्याची किंमत ही काही गोष्टींवर निर्धारित असते जसे की त्याचा आकार, रंग, त्याचा पृष्ठभाग, नॅक्रेची गुणवत्ता आणि त्याची चमक. आज बाजारात सर्वात महाग मोती हे दक्षिण समुद्रात सापडतात, जे नैसर्गिक रित्या पांढऱ्या आणि सोनेरी छटामध्ये असतात. या मोत्यांची किंमत काही हजार ते लाखों रुपया पर्यंत असू शकते.

Pearl Benefits

मोत्याचे फायदे

  • मोत्याचा हार किंवा मोत्याची अंगठी किंवा कानातले, बांगड्या, नथ इत्यादी दागिने मोत्यांच्या रूपात खूप सुंदर दिसतात. मोत्यांचे दागिने हे माणसाचे सौंदर्य वाढते.
  • फुटलेल्या मोत्यांचा उपयोग बटणे तयार करण्यासाठी केला जातो.
  • तसेच मोत्याची औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे मोती हा थंड व पित्त नाशक आहे. खास करून दृष्टीरोग, विषबाधा, क्षय , तोंडातील रोग इत्यादी वरील औषधात मोत्याचा वापर केला जातो. तसेच कफ, खोकला यावरील औषधां मध्ये ही याचा उपयोग केला जातो.
  • काही सौंदर्य साधनां मध्ये ही मोत्याची पावडर वापरली जाते.
  • आयुष्य वाढवण्यासाठी तसेच शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच मोत्याचा वापर काही खाद्य पदार्थां मध्ये सुद्धा केला जातो, जसे की च्यवनप्राश किंवा टॉनिक.
  • संवर्धित मोत्याच्या उत्पादनातून भारतात कोटींची उलाढाल केली जाते.
  • शेती पूरक व्यवसाय म्हणूनही मोती उत्पादन कडे पाहिले जाते. कारण कमी मेहनतीत आणि कमी खर्चात मोती तयार करण्याचा व्यवसाय तुम्हाला भरपूर नफा करून देऊ शकतो.

Where are Pearls Found?

मोती कोठे आढळून येतो

मित्रांनो, मोत्याचे विविध प्रकार असतात. त्याच विविध प्रकार नुसार मोती विविध ठिकाणी सापडतात.

साउथ सी चे व्हाईट मोती हे इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या किनार्‍यावर आढळून येतात.

तर अकोया मोती किंवा अकोया पर्ल हे जपान मधील खाऱ्या पाण्यात आढळतात.

गोड्या पाण्याचे मोती हे चीन मधील नद्यामध्ये तसेच जपान आणि यूएसए मध्ये सुद्धा आढळतात. हे मोती दिसायला साधारणतः ते पांढरे आणि गुलाबी रंगाचे दिसतात.

आकर्षक दिसणारे काळे मोती हे फ्रेंच मधील बेटांवर आढळून येतात. काळे मोती हे फार दुर्मिळ व किंमती मानले जातात.

भारतात मोती हे प्रामुख्याने मानारचे आखात, कछ चे आखात, गुजरात मधील काही ठिकाणी व महाराष्ट्रात रत्नागिरीत आढळतात. याशिवाय मोती हे श्रीलंका, दक्षिण पॅसिफिक महासागर, अमेरिका इत्यादी ठिकाणी आढळून येतात.

How to care for Pearl Jewelry

मोत्याची काळजी कशी घ्यावी

मित्रांनो, मोत्याचे दागिने प्रत्येकाकडे असतातच. पण मोत्याच्या दागिन्यांची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. कारण ते दिसायला नाजूक असतात आणि त्यावर हवेतील आर्द्रतेचा पण खूप परिणाम होतो.

मोत्याचे दागिने घालून झाल्यावर ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे जेणेकरून त्यावरील धूळ किंवा घामामुळे खराब झाले असेल तर ते पुसून जाईल.

मोत्याचे दागिने जास्त हवाबंद डब्यात ठेवू नका. अधून मधून काढत जा.

अंघोळ करताना मोत्याचे दागिने घालू नये कारण पाण्यात जास्त राहिल्याने ते खराब होऊ शकतात.

इतर दागिन्या सोबत मोत्याचे दागिने ठेवू नका.

स्प्रे किंवा परफ्युम पासून दागिने लांब ठेवा, त्यामुळे मोती खराब होऊ शकतात.

Pearl Colors

मोत्याचा रंग

मित्रांनो, मोत्ताचा रंग हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थिती वर अवलंबून असतो. मोत्याचा रंग हा काळा किंवा पांढरा असू शकतो. मुख्य म्हणजे गुलाबी रंगाचा मोती हा सर्वोत्कृष्ट मोती समजला जातो. शिवाय पूर्ण गोल व पांढऱ्या रंगाचा मोती सर्वोत्कृष्ट मानला जातो. याशिवाय काळा, राखाडी, हिरवा, निळा, वगैरे रंगांचेही मोती आढळून येतात.

या रंगावरूनच मोत्याच्या जाती सुद्धा ठरवल्या जातात. जसे की बसराई, ढबदार, नूर, मजीट, शुक्री व हरमुजी. यांपैकी बसराई मोतीला खूप मौल्यवान मोती समजले जाते.

रंगा शिवाय मोत्याचे वजन ही त्याचे सर्वोत्कृष्ट असल्याचे परिमाण आहे. ज्या मोत्याचे वजन 0.0162 ग्रॅम पेक्षा कमी असेल, त्याला बीजमोती म्हणतात. एक ग्रॅम वजनात साधारणतः 200 ते 300 मोती बसतात. याशिवाय बरोक मोती हा सर्वांत जास्त वजनदार मानला जातो. शिवाय खरा मोती हा वजनदार असतो.

तर मित्रानो, अश्या प्रकारे आपण आज मोती बद्दल अधिकाधिक जाणून घेतले. आशा आहे की तुम्हाला आजचा लेख नक्कीच आवडला असेल.

धन्यवाद !