पैठणी साडी बद्दल इतंभूत माहिती | खरी पैठणी साडी कशी ओळखावी
नमस्कार मित्रांनो, आज आपण पैठणी साडी बद्दल काही माहिती बघणार आहोत. यात खास करून खरी पैठणी कशी ओळखावी व पैठणी साडीची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, साडी हा प्रकार प्रत्येक स्त्रीला आवडतोच. त्यातल्या त्यात जर मौल्यवान, भरजरी, आकर्षक, उत्तम रंगसंगत व सुंदर नक्षीकाम असणारी पैठणी साडी असेल तर मग विचारायलाच नको, कारण प्रत्येक स्त्रीची इचछा असते की आपल्या कडे एकतरी पैठणी असावी.
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या पैठणी या साडीला ‘महावस्त्र’, ‘साड्यांची महाराणी’ असे देखील म्हटले जाते. कुठलाही सण असो, लग्न असो, किंवा कार्यक्रम असो साड्यांमध्ये पहिली पसंती ही पैठणीलाच दिली जाते.
How does Paithani Saree get its name?
मित्रांनो, गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या गावावरून या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले असे म्हटले जाते.
पैठणी साडीची परंपरा ही दोन हजार वर्षां पूर्वीची आहे, असे म्हटले जाते. एक पैठणी तयार करण्यासाठी 4 महिने ते एक वर्ष लागते. तसेच ही साडी तयार करताना खुप कष्ट व मेहनत लागते. पूर्वी पैठणी हाताने तयार करताना सोन्या चांदीचे धागे वापरून विणकाम केले जायचे. पण आता त्यांची जागा रेशीमच्या धाग्यांनी घेतली आणि आता पैठणी बनवण्यासाठी मशीन्स चा वापर केला जातो.
पैठणी साडीचे वैशिष्ट्य
मित्रांनो, पैठणी साडीचे खास वैशिष्टय म्हणजे ती दोन्ही बाजुंनी समानच असते. म्हणजे मागील बाजू व पुढील बाजू सारखीच दिसते. पूर्वीच्या काळात पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे पण कालांतराने पैठणी विविध रंगातही जसे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी, आदी रंगा मध्येही तयार होऊ लागली.
पैठणीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही टोकांवर तिला एक समान रंग असतात. पदारांवर सुद्धा एकसमान डिझाईन केलेली असते. त्यामुळे जरी ती एकीकडून खराब झाली तरी दुसरी कडून आपल्याला ती साडी परत नेसता येते.
पैठणी साड़ी चे वैशिष्ट म्हणजे या संपूर्ण साडीला हाताने (हस्तकला) नक्षी काम केलेले असते. ही पैठणी बनवायला अतंत्य अवघड असते. याचे काम पण एकदम बारीक असते. त्यामुळे त्याची किंमत काही हजार ते लाखां मध्ये असते.
ही पैठणी विणताना त्यात उभा धागा एका रंगाचा आणि आडवा धागा वेगळ्या रंगाचा वापरला जातो. त्यामुळे पैठणीला धुपछाव प्रकारची दिसते. पैठणी वर कोयरी, बांगडी, पोपट, आंबा, अश्रफी, पारवा, मोर,अमरवेल ,नारळ, अशी विविध प्रकारची नक्षी आढळते.
खरी पैठणी कशी ओळखावी
How to Identify Real Paithani
मित्रांनो, बदलल्या काळाप्रमाणे पैठणी मध्येही बदल होत आहेत. पैठणीतही वेगवेगळ्या डिझाइन्सचा आल्या आहेत. हातमागावरची पैठणी आता मशिनवर तयार होत आहेत. त्यामुळे अनेक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे तुम्हाला खरी म्हणजेच हातमागावरची पैठणी आणि मशिन वर बनवलेली पैठणी यातला फरक समजणे खूप आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात, खरी पैठणी कशी ओळखायची.
पैठणी खरी आहे की नाही हे ओळखण्याचे सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याची किंमत. मित्रांनो, खरी पैठणी साडी दोन हजार ते पाच हजारात कधीच मिळत नाही कारण ओरीजनल पैठणी साडी ही दहा हजार रुपया पेक्षा जास्त किंमतीत भेटते. तसेच पैठणी खरेदी करताना दुकानदार ओरीजनल पैठणीची कमीत कमी दहा वर्ष वॉरंटी देतात, पैठणी खोटी किंवा डुप्लिकेट असेल तर कोणीही त्याची वॉरंटी देणार नाही.
याशिवाय हातमागावर तयार केलेल्या पैठणीचे धागे दोन्ही बाजूंनी सारखेच दिसतात. यात धागा कुठेच कापला जात नाही. दोन्ही बाजूंनी पैठणीची डिझाईन सारखीच दिसते. त्याच्या धाग्यांमध्येही सारखेपणा असतो. तसेच पैठणी साडीची बॉर्डर आणि पदर दोन्ही दिसायला सारखेच असतात आणि खऱ्या पैठणीची जर ही शुद्ध असते त्यामुळे ती कधीच काळी पडत नाही.
याऊलट मशिन मध्ये बनवलेल्या पैठणीचे धागे दोन्ही बाजूंनी वेगळे व तुटलेले दिसतात. मशिन मध्ये बनवल्यामुळे पदराच्या मागच्या बाजूने धागे खुले झालेले किंवा तुटलेले असतात.
पैठणी साडीची काळजी कशी घ्यावी
How to care Paithani Saree
- मित्रांनो, पैठणी साडी खूप महाग असते. त्यामुळे तिची काळजी व्यवस्थित घेणे गरजेचे असते.
- पैठणी साडी ही एखाद्या मऊ किंवा कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवावी त्यामुळे त्याची जर छान टिकते.
- तसेच जरीला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
- साडी वर थेट सूर्य प्रकाश पडू देऊ नये.
- प्रत्येक वापरा नंतर ती साडी धुऊ नये. गरज असेल तरच धुवावी. ती पण घरी न धुता ड्रायक्लीनला द्यावी.
- वर्षातून किमान एकदा साडीला उन्ह दाखवा. फक्त साडीवर थेट ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी. थोडक्यात काय तर साडी सावलीत टाकावी त्यामुळे त्याची चमक जाणार नाही.
तर मित्रांनो, अश्या या महाराष्ट्राच्या महावस्त्र पैठणी साडी बद्दल आज आपण जाणून घेतले. आशा आहे तुम्हाला आजचा लेख नक्कीच आवडेल असेल.
धन्यवाद!
Tags – Paithani Sadi Info, Paithani Sari Information, Paithani Sadi Information, Paithani Sadi Mahiti, Paithani Marathi, पैठणी साडी माहिती, पैठणी साडी मराठी