मराठमोळ्या मंगळसूत्राच्या विविध प्रकारच्या डिझाईन्स
नमस्कार मित्रांनो, आज आपण मंगळसूत्राच्या विविध प्रकारच्या डिझाइन्स आणि त्यांची नाहीती बघणार आहोत.
मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आत्ताच्या काळात इतर दागिन्यांसोबतच सौभाग्य अलंकार मध्येही अनेक प्रकार किंवा अनेक प्रकारच्या डिझाइन्स पाहायला मिळत आहेत. कुठलाही सणवार असो किंवा व्रत वैकल्य किंवा एखादा समारंभ, नटताना स्रिया दागिन्यांना खूप महत्व देतात. त्यातल्या त्यात सौभाग्य अलंकार तर चांगले हवेच. हेच सौभाग्य अलंकार जर हटके किंवा नेहमीपेक्षा वेगळे दिसणारे असेल तर विचारायलाच नको. याच सौभाग्य अलंकारपैकी एक महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र.
या मंगळसूत्रा मध्येही अनेक प्रकार बघायला मिळतात. पूर्वी फक्त मोठे मंगळसूत्र व मुहूर्तमणी एवढंच काय ते नटण असायचं, पण आता आकर्षक दिसणारे, लहान मंगळसूत्र, वेगळ्या डिझाइन्स चे मंगळसूत्र बाजारात बघायला मिळतात, आणि स्रिया देखील सर्रासपणे यांचा वापर करतात. आता या मंगळसूत्र कडे फक्त सौभाग्य अलंकार म्हणूनच नाही तर सौंदर्य वाढवणारा अलंकार म्हणूनही पाहिले जाते.
चला तर मग जास्त वेळ न लावता मंगळसूत्राचे विविध प्रकार बद्दल जाणून घेऊया.
Maharashtrian Mangalsutra Designs Information in Marathi
वाटी मंगळसूत्र
वाटी मंगळसूत्र (Vati Mangalsutra) ही खूप सामान्य डिझाईन आहे. वाट्यांचे मंगळसूत्र हे प्रत्येक स्त्रीकडे असतेच. हे मंगळसूत्र लांबीला लहान किंवा मोठे कसेही असू शकते. फक्त यामध्ये सिंगल वाटी आणि डबल वाटी असे प्रकार असतात. वाटीच्या डिझाईन्स मध्ये सुद्धा आपल्याला विविधता बघायला मिळते. जसे की वाटीमध्ये शिंपल्यांचा आकार, फुलाचा आकार किंवा वाटीच्या टेक्शर मध्येच बदल केलेला दिसून येतो.
कोल्हापुरी मंगळसूत्र
कोल्हापुरी मंगळसूत्र (Kolhapuri Mangalsutra) हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. हे मंगळसूत्र थोडे वेगळे असते. याचे विशेष सांगायचे झाले तर कोल्हापुरी साज मध्ये जसे पेंडट असते तसेच पेंडेंट या मंगळसूत्रात लावलेले असते. या पेंडेंट सोबत काळ्या मण्यांची सर असते.ही सर अगदी दोन ते सहा सरींपर्यंत असू शकते. हे मंगळसूत्र गळ्यालगत असेल तर ते आणखी सुंदर दिसते.
चेन मंगळसुत्र
मित्रांनो, बऱ्याच स्त्रीयांना खूप जास्त काळे मणी असलेले मंगळसूत्र घालायला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही चेन मंगळसूत्र (Chain Mangalsutra) घालु शकता. चेन मंगळसूत्रात वाट्या किंवा पेंडंट करता येते. या मंगळसूत्रात पेंडंटच्या आजुबाजूला फार कमी असे काळे मणी असतात. त्यामुळे ते मंगळसूत्र इतर कोणत्याही कपड्या वर तुम्ही ते घालू शकता.
थोडक्यात काय तर या मंगळसूत्रात काळे मणी जास्त दिसू नये म्हणून यात सोन्याचे मणी घातले जातात व त्यालाच सुंदर लुक देण्यासाठी बाहेरून किंवा आतून चेन लावली जाते, त्यामुळे हे मंगळसूत्र थोडे वेगळे दिसते.
पेशवाई मंगळसूत्र
मंगळसूत्राचा हा आणखी एक वेगळा प्रकार आहे. हा प्रकार कोल्हापुरी साज सारखा दिसतो. तसेच दिसायला हा प्रकार थोडासा तन्मणी सारखा दिसतो कारण तन्मणी मध्ये असणारे थोडे लांब पेंडंट यामध्ये देखील असते. या पेशवाई मंगळसूत्रला (Peshwai Mangalsutra) काळ्या मण्यांची सर असते. या मंगळसूत्राच्या पेंडेंट मध्येही वेगवेगळे प्रकारचे डिझाइन्स बघायला मिळतात. या मध्ये कधी कधी इतर रंगाचे स्टोन्स देखील लावले जातात.
बोल्ड चेन मंगळसूत्र
नावा प्रमाणेच हे बोल्ड चेन मंगळसूत्र (Bold Chain Mangalsutra) दिसायला अगदी भारदस्त असते. याची चेन जाड असल्यामुळे ते लांब व ठसठशीतपणे दिसते. घरगुती कार्यक्रमा मध्ये जर तुम्हाला इतर कोणतेही दागिने घालायचे नसतील तर तुम्ही हे बोल्ड चेन मंगळसूत्र घालू शकता. आजकाल अनेक स्रिया साडीवर इतर दागिने घालण्यापेक्षा या मंगळसूत्राला घालणे जास्त पसंत करतात.
सहा पदरी मंगळसूत्र
सहा पदरी मंगळसूत्र (Six Layer Mangalsutra) मंगळसूत्र दिसायला बोल्ड चेन मंगळसूत्रा पेक्षा जास्त मोठे दिसते. आगरी आणि कोळी स्रिया या प्रकारचे मंगळसूत्र घालतात. हे मंगळसूत्र इतर मंगळसूत्रा पेक्षा वेगळे आणि ठसठशीत असते. याचे पेंडेंट ही खूप मोठे व भक्कम असतात. या पेंडेंट मध्ये ही खूप प्रकारच्या डिझाइन्स पहायला मिळतात.
डायमंड मंगळसूत्र
स्रियांना आपल्याकडे एक तरी हिरा असावा असे वाटत असते. तसेच बऱ्याच स्रियांना रोज घालण्यासाठी असे मंगळसूत्र हवे असते जे वेगळे आणि सुंदरही दिसेल. अशा स्त्रीयांसाठी डायमंड मंगळसूत्र (Diamond Mangalsutra) हा प्रकार खूप योग्य आहे. या मध्ये तुम्ही चेन किंवा काळ्या मण्यांच्या सरीं मध्ये छोटे आकाराचे गोल किंवा चौकोनी हिऱ्याचे पेंडेंट बनवू शकता. आजच्या काळात डायमंड मंगळसूत्र ची तरुण स्रियांमध्ये खूप क्रेझ असल्याचे दिसून येते. कारण या मंगळसूत्रामुळे खूप सुंदर आणि क्लासी लुक येतो.
डायमंड वाटी मंगळसूत्र
तुम्हाला जर वाटी मंगळसूत्र आवडत असेल तर तुम्ही त्यात डायमंड चा विचार करू शकता. डायमंड वाटी मंगळसूत्र (Diamond Wati Mangalsutra) दिसायला खूपच सुंदर आणि ट्रेंडी दिसते. यामध्ये लहान किंवा मोठे असे मंगळसूत्र करू शकता. या प्रकारच्या मंगळसूत्रात असलेल्या डायमंडच्या वाट्याचा आकार लहान मोठा सुद्धा बनवून घेऊ शकता.
बऱ्याच स्रियांना तेच तेच चालत आलेले मंगळसूत्र नको असते. काही स्रियांना काहीतरी वेगळे म्हणून त्यांच्या आणि नवऱ्याच्या नावाचे इनिशिअल म्हणजेच पहिले अक्षर घेऊन पेंडंट बनवायला आवडते. याशिवाय फक्त नावांचे इनिशीयल न घेता पूर्ण नावाचे पेंडेंट देखील बनवून घेऊ शकता. या प्रकारचे मंगळसूत्र दिसायला अतिशय सुंदर आणि रिच दिसतात. हे मंगळसूत्र शक्यतो चेन मध्ये बनवले जाते.
हार्ट पेंडेंट मंगळसूत्र
तुम्हाला जर तेच तेच जुने पेंडेंट असलेले मंगळसूत्र नको असेल, तर तुम्ही हा प्रकार नक्की निवडू शकता. या प्रकारच्या मंगळसूत्रात हार्ट शेप चे पेंडेंट असते. हे हार्ट शेप चे पेंडेंट तुम्हाला डायमंड मध्ये किंवा सोन्या मध्येही बनवून घेता येते. अश्या प्रकारचे पेंडेंट तुम्ही मालिकां मध्ये किंवा सिनेमात नक्की पाहिले असेल. हे दिसायला खूपच आकर्षक व नाजूक दिसते. त्यामुळे ते तुम्ही कोणत्याही कपड्यांवर घालू शकतात. अगदी पंजाबी ड्रेस किंवा जीन्स टॉप वर सुद्धा घालू शकता.
तर मित्रानो, आपल्या हिंदू संस्कृतीत सौभाग्याचे अलंकार समजले जाणारे असे हे मंगळसूत्र व त्याचे विविध प्रकारचे डिझाइन्स आज आपण बघितले. आशा आहे हि आजचा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
धन्यवाद !