सोने किंवा सोन्याचे दागिने कुठून खरेदी करावे? ब्रँडेड vs लोकल ज्वेलरी शॉप | Where to buy Gold Jewellery?
नमस्कार मित्रानो, आज आपण सोने किंवा सोन्याचे दागिने लोकल शॉप मधून खरेदी करावे की ब्रँडेड शॉप मधून, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपले सौंदर्य वाढवणारी गोष्ट म्हणजे आपले कपडे. कपड्यांमुळे आपल्या सुंदरतेत वाढ होते. पण या कपड्यांसोबतच अजून एक गोष्ट आहे जी आपल्या सुंदरतेत अजूनच भर टाकते, ती गोष्ट म्हणजे दागिने. आणि त्यातल्या त्यात आपण भारतीय लोक सोन्याच्या दागिन्यांना अनन्य साधारण महत्व देतो. कारण दागिने म्हटलं की ते सोन्याचे च असावेत असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. आणि त्यामुळे प्रत्येक स्त्री च्या कपाटात सोन्याचे दागिने नाही असे होऊच शकत नाही. मित्रांनो, सोन्याच्या दागिन्यांचे ग्राहक हे अख्ख्या भारतभर आहेत. खरंतर ही गोष्ट मी सांगायची गरज नाही, कारण सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानाची असणारी संख्याच सांगते की सोन्याला किती महत्त्व आणि मागणी आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, सोने खरेदी करताना ते कोणत्या दुकानात खरेदी करावे हा विचार आपण कधीच करत नाही. सोनेच खरेदी करायचे आहे ना मग कुठल्याही दुकानात केले तरी काय फरक पडतो. कुठेही गेलो तरी सगळीकडे सोने सारखेच. असं आपण म्हणतो. पण आपला हा विचार किंवा हा विश्वास योग्य आहे का? तर नाही; विशेषत: जेव्हा आपण सोन्याच्या बाजारात जातो तेव्हा तिथे असलेल्या अशुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या प्रमाणाचा विचार करतो. तेव्हा बर्याचदा, उच्च शुद्धतेच्या दागिन्यांच्या किंमतीवर अशुद्ध सोन्याचे दागिने देऊन आपली फसवणूक केली जाते. मग वास्तविक सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी जावे तरी कुठे हा एक प्रश्न च आहे. पण मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने कुठून खरेदी करावे? लोकल शॉप मधून की ब्रँडेड शॉप मधून? या बद्दल सांगणार आहोत. तसेच सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही या बद्दल ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
ब्रँडेड ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करण्याचे फायदे
सर्वात पहिले ब्रँडेड शॉप मधून सोने खरेदी करण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या.
- Designs/डिझाईन्स:- मित्रांनो, प्रत्येक ज्वेलर कडे दागिन्यांचे स्वतःचे च डिझाइन असतील असे नाही. काही ज्वेलर्स एखाद्या मॅन्युफॅक्चर कडून दागिन्यांचे डिझाइन्स बनवून घेतात. पण ब्रँडेड शॉप मध्ये घेतलेल्या दागिन्यांची डिझाइन व त्याची फिनिशिंग प्रॉपरली व अतिशय सुंदर केलेली असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादया ब्रँडेड ज्वेलरी शॉप मधून दागिने घेता तेव्हा तुम्हाला दागिन्यांची फिनिशिंग व दागिन्यांची डिझाइन्स चांगलेच भेटतात.
- Transparency/पारदर्शकता:- मित्रांनो, शॉप जर ब्रँडेड असेल तर त्या ज्वेलरला त्यांच्या शॉप मध्ये प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता ठेवणे आवश्यक असते. यात दागिन्यांचे मेकिंग चार्जेस त्या त्या दागिन्यांनुसार वेग-वेगळे असते, जे तुम्हाला खरेदी करताना सांगितले जाते. तसेच गोल्ड एक्सचेंज करण्यासाठी ज्या पॉलिसी असतात त्यात ही तुम्हाला पारदर्शकता दिसून येईल. ज्याचा तुम्हाला थोडा फार का होईना फायदा होतो. त्यामुळे ब्रँडेड शोरूम मध्ये दागिन्यांच्या बाबतीत तुम्हाला पारदर्शकता असलेली दिसून येते.
- Buy anywhere Sell anywhere/कुठेही खरेदी करा कुठेही विक्री करा:- मित्रांनो, ज्वेलरीच्या काही ब्रँडेड शोरूम चे इतर शहरातही ब्रांचेस असतात. त्यामुळे तुम्ही एखादया ब्रँडेड ज्वेलर कडून सोन घेतले आणि जर दुसऱ्या शहरात जाऊन तुम्हाला ते एक्सचेंज करायचे असेल तर त्याच शोरूम दुसऱ्या शहरातील ब्रांच मध्ये जाऊन सेम पॉलिसी मध्ये तुम्ही तुमचे सोने एक्सचेंज करू शकता. ही फॅसिलिटी तुम्हाला फक्त ब्रँडेड ज्वेलरी शॉप मध्ये मिळते.
- SOP/मानक ऑपरेटिंग प्रक्रिया:- मित्रांनो, ब्रँडेड शोरूम चे जे काही रूल्स किंवा रेट असतात ते फिक्स असतात. तिथे तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस कमी असतात. उदाहरणार्थ, समजा एखादया प्रॉडक्ट चे मेकिंग चार्जेस 8 टक्के आहे तर तुमच्या कडून 9 टक्के घेतले जात नाही.
ब्रँडेड ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करण्याचे तोटे
आता ब्रँडेड ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करण्याचे तोटे काय आहेत ते जाणून घेऊ या.
- High Price/जास्त किंमत:- मित्रांनो, ब्रँडेड ज्वेलरी शॉप मध्ये कधी कधी सोन्याचा भाव बाजार मूल्य पेक्षा जास्त घेतला जातो. त्याची कारणं ज्वेलर्स लोक वेग वेगळे देतात. पण अश्या मोठ्या दुकानांमध्ये सोन्याची थोडी फार जास्त किंमत घेतली जाते.
- Making Charges/मेकिंग चार्जेस:- मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सोन्याच्या प्रत्येक दागिन्यावर मेकिंग चार्जेस लावले जातात. पण लोकल ज्वेलरी शॉप पेक्षा ब्रँडेड ज्वेलरी शॉप मध्ये मेकिंग चार्जेस निश्चितच जास्त लावले जातात. त्याचे कारण म्हणजे दागिन्यांची फिनिशिंग, व युनिक डिझाइन्स.
- Can’t change according to your needs/आपल्या गरजेनुसार बदल करू शकत नाही:- मित्रांनो, ब्रँडेड शोरूम मध्ये एखादी वस्तू तुमच्या म्हणण्यानुसार मिळत नाही. म्हणजे जसे की समज एखादी 22 कॅरेट ची ज्वेलरी तुम्हाला खूप आवडली आहे. पण तुमचे तेवढे बजेट नसल्याने तुम्हाला जर तीच वस्तू किंवा दागिना 18 कॅरेट मध्ये बनवून हवा असेल तर ते ब्रँडेड शॉप मध्ये बनवून दिले जात नाही. याचे कारण म्हणजे या शॉप चे काही ठरलेले रूल्स असतात जे ते तुमच्या आवश्यकते नुसार मोडत नाहीत.
लोकल ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करण्याचे फायदे
- Designs not ready but they can arrange/डिझाईन्स तयार नसतात पण उपलब्ध करून देऊ शकतात:- मित्रांनो, लोकल ज्वेलरी शॉपचा एक फायदा म्हणजे या शॉप मध्ये तुम्हाला हवी असलेले दागिन्यांचे डिझाइन्स नाही मिळाले तर लोकल ज्वेलर्स तुम्हाला ते उपलब्ध करून देतात.
- Low Price/कमी किंमत:- मित्रांनो, ब्रँडेड शॉप च्या तुलनेत लोकल ज्वेलरी शॉपची किंमत नक्कीच थोडी फार कमी असू शकते.
- Low Making Charges/कमी मेकिंग चार्जेस:- मित्रांनो, लोकल दुकानात सोने करण्याचा फायदा म्हणजे या दुकानांमध्ये कस्टमर बेस कमी असल्याने मेकिंग चार्जेस ही कमी घेतले जातात.
- Can change according to your needs/आपल्या गरजेनुसार बदल करू शकता:- लोकल ज्वेलरी शॉप मध्ये तुमच्या आवश्यकते नुसार तुम्हाला दागिने बनवून दिले जातात. जसे की समजा तुम्हाला 22 कॅरेट सोन्याचा दागिना 18 कॅरेट मध्ये बनवून हवा असेल तर तो तुम्हाला बनवून दिला जातो.
लोकल ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करण्याचे तोटे
- Not any SOP/मानक ऑपरेटिंग प्रक्रिया:- मित्रांनो, लोकल ज्वेलरी शॉप मध्ये जास्त रूल्स फॉलो केले जात नाही. म्हणजे त्यांची कोणती SOP (standard operating procedure) नसते. तुमच्या ओळखीने किंवा भाव करण्याच्या पद्धतीवर ते चेंज होतात.
- No Transparency/पारदर्शकतेची कमी:- मित्रांनो, लोकल दुकानात तुम्हाला पारदर्शकता कमी प्रमाणात बघायला मिळेल. पण तुम्हाला जर आधीच सोन्याचे थोडे फार नॉलेज असेल तर तुम्हाला ट्रानस्परन्सी चा जास्त फरक पडणार नाही.
- Don’t have multiple branches/अनेक शाखा नसतात:- मित्रानो, लोकल ज्वेलरी शॉपचे जास्त ब्रांचेस बघायला मिळत नाही. हा एक ड्रॉबॅक/दोष आहे पण इतर गोष्टी चांगल्या असल्याने या गोष्टीचा फरक पडला नाही पाहिजे.
थोडक्यात काय तर तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर ते शक्यतो लोकल ज्वेलरी शॉप मधूनच खरेदी करावे. कारण तिथे प्राईस पण कमी असते, मेकिंग चार्जेस पण कमी असतात, तुमच्या आवडीनुसार ते चेंज पण होतात. आणि जर एखादी गोष्ट त्यांच्याकडे नसेल तर ते तुम्हाला ती गोष्ट उपलब्ध करून देतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो आपलेपणा व माणुसकी व विश्वास तुम्हाला लोकल शॉप मध्ये मिळतो तो इतर कुठेही मिळणार नाही. त्यामुळे सोने खरेदीसाठी तुम्ही लोकल शॉप ला सपोर्ट करावा असे आम्हाला वाटते. पण जर तुम्हाला वेग-वेगळ्या डिझाईन्स घालायला आवडत असेल आणि तुम्ही जास्त प्रवास करत असाल तर मात्र तुम्ही ब्रँडेड शॉपमधूनच सोने खरेदी करावे.
सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून पहाव्यात?
- मित्रांनो, तुम्ही सोने ब्रँडेड शॉप मधून घेत असाल किंवा लोकल शॉप मधून, पण सोने खरेदी करताना तुम्हाला सोन्याबद्दल बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. तसेच काही गोष्टी तपासून पाहणेही आवश्यक असते. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊ या.
- सोने खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करावे. हे सोन्याची शुद्धता व उच्च दर्जा दर्शविते.
- मित्रांनो, सोने खरेदी करताना त्याची किंमत क्रॉस चेक करणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही किती कॅरेट चे सोने घेत आहात त्यावर ही त्याची म्हणजे सोन्याची किंमत ठरते.
- अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खरेदी करत असलेल्या दागिन्यांचे मेकिंग चार्जेस किती आहेत त्यांची चौकशी करा. व थोडी घासाघीस करून मेकिंग चार्जेस कमी करण्याचा प्रयत्न करा. काही दुकानदार मेकिंग चार्जेस कमी करून देतात ही. त्यामुळे या गोष्टीकडे ही लक्ष ठेवावे.
- सोने खरेदी करताना विश्वसनीय दुकानदार कडूनच खरेदी करावे. कारण अनोळखी ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता असते.
- तसेच तुम्ही सोन्याचे पुनर्विक्री करण्याचे मूल्य म्हणजेच री-सेल व्हॅल्यू बद्दल नक्की विचारले पाहिजे. तसेच ज्वेलर्सच्या बाय-बॅक पॉलिसी बद्दल ही जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला भविष्यात सोन विकायची गरज पडली तर अडचण येणार नाही.
- तुम्ही जर सोने एक गुंतवणूक म्हणून घेण्याचा विचार करत असाल तर शक्यतो रत्न जडीत म्हणजे स्टोन असलेले दागिने घेणे टाळावे.
- तसेच तुम्ही जर स्टोन असलेले दागिने घेत असाल तर त्याचे म्हणजेच सोन्याचे वेगळे व स्टोन चे वेगळे असे दोघांचे वेगवेगळे वजन केले जात आहे की नाही ते चेक करा. कारण बऱ्याचदा दुकानदार सोन्याचे व स्टोन चे वजन एकत्र करतात व त्याच हिशोबाने सोन्याचे मूल्य चार्ज करतात. इथे तुमची फसवणूक होऊ शकते म्हणून सतर्क रहा.
- तसेच सोने खरेदी करताना ते किती कॅरेटचे आहे ते देखील जाणून घ्या. कारण अनेकदा ज्वेलर्स 24 कॅरेट सोन्याचा भाव चार्ज करतात. त्यामुळे तुम्ही घेत असलेला दागिना किती कॅरेट चा आहे ते जाणून घ्या.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सोने कुठून खरेदी करावे व सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून पहाव्यात या बद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा महत्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र-मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्याच नवं-नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद
Tags: Sone Kothun Kharedi Karave, Sone Local Shop Madhun Kharedi Karave Ka, Sone Branded Jewelry Shop Madhun Kharedi Kele Tar Fayde Kay