MarathiDiamond (हिरा)Popular Post

प्रयोगशाळेत तयार केलेले मानवनिर्मित हिरे | Lab Grown Diamond information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण मानव निर्मित हिऱ्यांबद्दल म्हणजेच Lab Grown Diamonds बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Lab Grown Diamond information in Marathi

मित्रांनो, हिरे जसे खाणीतून काढले जातात. तसेच हिऱ्यांना फॅक्टरी मध्ये सुद्धा बनवले जाऊ शकते. अश्या हिऱ्यांना कृत्रिम हिरे किंवा मानव निर्मित हिरे असे देखील म्हटले जाते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोग शाळेच्या योग्य त्या नियंत्रित वातावरणात हे हिरे तयार केले जातात. ज्या प्रकारे पृथ्वीच्य खाली नैसर्गिक हिरे जसे तयार होतात, तसेच वातावरण प्रयोग शाळेत तयार केले जाते व त्यानुसार हिरे बनवले जातात. प्रयोग शाळेत बनवलेले हिरे हे नैसर्गिक हिऱ्यां सारखेच बनलेले असतात, त्यामुळे ते त्याच गुणधर्माचे असतात.

मित्रानो, खर तर हिरा हा कार्बोच्या अणूंचा एक मोठा समूह आहे. जो खूप जवळ जवळ एकमेकांशी बांधलेला असतो. जेव्हा या कार्बनच्या अणूंना खूप जास्त तापमानाखाली एकत्र केले जाते व त्यावर दबाव टाकला जातो तेव्हा हिरा तयार होतो. फॅक्टरी मध्ये किंवा प्रयोग शाळेत हिरे बनवताना याच पद्धतीचा वापर केला जातो. हे हिरे तयार झाल्या नंतर एखाद्या एक्स्पर्ट व्यक्ती कडून या हिऱ्याला कट करून पॉलिश केले जाते. जेणेकरून तो अगदी खऱ्या हिऱ्या सारखा चमकतो.

मित्रांनो, नैसर्गिक हिऱ्या प्रमाणेच कृत्रिम हिरा सुद्धा कार्बन च्या अणूंपासून प्रयोग शाळेत तयार केला जातो, आणि त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते. त्यामुळे हा हिरा नैसर्गिक हिऱ्यासारखा खूप कठोर व कडक असतो.

प्रयोग शाळेत वेगवेगळ्या रंगांमध्ये हिरे तयार केले जाऊ शकतात. विविध रंगाचे फॅन्सी हिरे सुद्धा प्रयोग शाळेत तयार केले जावू शकता.



प्रयोग शाळेत तयार केलेला हिरा, खरा हिरा असतो का?

होय. प्रयोग शाळेत तयार केलेला हिरा हा अगदी खरा हिरा असतो. एवढेच नाही तर आधुनिक रत्न प्रयोग शाळाही त्याला हिरे म्हणून प्रमाणित करतात. यामध्ये फरक एवढाच आहे की या हिऱ्यांना खाणीतून न काढता ते प्रयोग शाळेत आवश्यक त्या योग्य वातावरणात तयार केले जातात.

प्रयोग शाळेत हिरे तयार करण्याचे फायदे

What Are The Benefits of Lab Grown Diamonds?

  • मित्रांनो, प्रयोग शाळेत तयार केलेला हिरा हा खऱ्या हिऱ्या सारखा असतो. त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म एकसारखेच असतात आणि ते नैसर्गिक हिऱ्याला तयार होण्यास जसे तापमान लागते तसेच आणि त्या सारख्याच तापमानात व परिस्थितीत हे कृत्रिम हिरे तयार केले जातात.
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अश्या प्रकारच्या नियंत्रित तापमानात आणि या प्रक्रियेमुळे प्रयोग शाळेत उगवलेले हिरे अनेकदा चांगल्या दर्जाचे असतात.
  • प्रयोग शाळेत तयार केलेले हिऱ्यांना तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खाण कामाची आवश्यकता नसते. ज्यामुळे पर्यावरणाची सुद्धा हानी होत नाही.
  • प्रयोग शाळेत तयार केलेल्या मानव निर्मित हिऱ्यांमध्ये खाणीतून काढलेल्या हिऱ्यां सारखेच सगळे गुणधर्म असतात. त्यामुळे ते चांगल्या दर्जाचे असतात.
  • प्रयोग शाळेत तयार केलेले हिरे हे त्याच्या रंग, आकार, कट आणि गुणवत्तेच्या आधारे नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा जास्त परवडणारे असतात. शिवाय आपण त्याची चांगल्या किमतीत पुनर्विक्री सुद्धा करू शकतो.
  • त्यांच्या चांगल्या गुणवत्ता आणि दर्जेमुळे ते अधिक सुंदर दिसतात. तसेच त्यांच्यात दोष सुद्धा कमी असतात. जसे की या प्रयोग शाळेत तयार केलेल्या हिऱ्यांना स्क्रॅच किंवा तडे जाण्याची शक्यता कमी असते.
  • प्रयोग शाळेत हिरे तयार करताना निसर्गात क्वचितच आढळणारे विविध रंगाचे हिरे तयार केले जाऊ शकतात.
  • प्रयोग शाळेत तयार केलेले हिरे हे विशिष्ट प्रक्रिया वापरून तयार केले जातात ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हानिकारक प्रक्रिया न करता त्या हिऱ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवता येते.
  • प्रयोग शाळेत तयार केलेले हिरे हे नैसर्गिक रित्या उत्खनन केलेल्या दगडांपेक्षा दिसायला शुद्ध असतात, कारण खणून काढलेल्या दगडांमध्ये प्रयोग शाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या तुलनेत थोडी जास्त घाण (अशुद्धता) असते. प्रयोग शाळेतील हिऱ्यांमध्ये कमी दोष असतात आणि त्यामुळे हा हिरा उजळ, चांगला असतो.
  • हिऱ्यांच्या खाणीमुळे पृथ्वीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, परंतु प्रयोग शाळेत तयार केलेल्या म्हनजेच मानव निर्मित कृत्रिम हिऱ्यांमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. त्यामुळे हिऱ्यांची खाण करण्यापेक्षा प्रयोग शाळेत हिरे तयार करणे हा अधिक चांगला पर्याय आहे.

तसेच हिऱ्याचे दागिने आपल्यासाठी किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी भेट म्हणून देण्यासाठी एक खूप छान वस्तू आहे. हिरे हे रोजचे दागिने म्हणून किंवा एखाद्या विशेष प्रसंगी परिधान केले जाऊ शकतात. प्रयोग शाळेत बनवलेले हिरे वापरणे म्हणजे एखाद्या आकर्षक वस्तूमध्ये गुंतवणूक करण्यासारखे आहे. म्हणजेच गुंतवणूक करण्यासाठी हिरा वापरणे हे खूप फायद्याचे ठरते.

प्रयोगशाळेत उगवलेले हिरे प्रमाणित आणि श्रेणीबद्ध कसे केले जातात?

How Are Lab Grown Diamonds Certified And Graded?

प्रयोग शाळेत तयार केलेल्या हिऱ्यांना खणून काढलेल्या हिऱ्यां सारखेच मानले जाते. हे हिरे तयार झाल्या नंतर, त्यांना रत्न तज्ञाद्वारे प्रमाणित करण्यासाठी स्वतंत्र अश्या रत्न प्रयोगशाळेत पाठवले जाते. तिथे प्रयोग शाळेत तयार केलेल्या हिऱ्यांना तपासले जाते आणि प्रत्येक हिऱ्याचे कट, स्पष्टता, कॅरेट आणि रंग यावर लक्ष दिले जाते व काळजी पूर्वक तपासणी केली जाते. तपासणी झाल्यावरच त्या हिऱ्यांना त्यांची श्रेणी देऊन त्यांचे आकार व वजन मोजून प्रमाणबद्ध केले जाते. हिऱ्याचे वजन हे कॅरेट मध्ये मोजले जाते.

प्रयोगशाळेत हिरा बनवण्यासाठी किती वेळ लागतो?

प्रयोग शाळेत मानव निर्मित हिरा बनवण्यासाठी सामान्यत: काही आठवडे लागतात. एक नैसर्गिक हिरा पृथ्वीवर जेवढ्या कालावधी मध्ये बनतो त्यापेक्षा हा खूप कमी कालावधी आहे. कारण नैसर्गिक रित्या हिरा बनण्यासाठी अंदाजे हाराजो वर्ष लागतात. त्यामुळे प्रयोग शाळेत कमी कालावधीत हिरा बनवणे हा एक चांगला पर्याय आहे.

कृत्रिमरीत्या हिरे कुठे बनवले जातात?

दागिन्यांच्या वापरासाठी कृत्रिम हिऱ्यांचे उत्पादन हे चीन, युक्रेन, रशिया, जपान, युनायटेड स्टेट्स आणि इतर अनेक देशांमध्ये होते.

मित्रांनो, प्रयोग शाळेत तयार केलेले हिरे हे खाणीतून काढलेल्या हिऱ्यां सारखेच असतात आणि जर तो हिरा प्रयोग शाळेत तयार केलेला आहे की नाही हे सांगायचे असेल तर ते एखाद्या रत्न शास्त्रज्ञाने किंवा तज्ञानें हिऱ्याला लेसर द्वारे किंवा भिंगाखाली पाहावे लागते.

मित्रांनो, तुम्ही जर हिऱ्याला गुंतवणूक म्हणून पाहत असाल तर हिऱ्यामध्ये गुंतवणुक करणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्यांना नेहमी मागणी असते आणि ते खूप टिकतात व ते हिरे संग्रहित करून ठेवणे सुद्धा सोपे आहे. आणि ते हिरे आपल्याला परवडण्यासारखे असतात.

तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण प्रयोग शाळेत तयार होणाऱ्या मानव निर्मित हिऱ्यांबद्दल माहिती बघितली. आशा आहे की तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद!