MarathiGold (सोने)

कॅरेट ( Karat ) म्हणजे काय? | 24 कॅरेट गोल्ड म्हणजे काय? | कॅरेटचे प्रकार – 24k, 22k, 18k आणि 14k

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण कॅरेट बद्दल अधिक माहिती बघणार आहोत. यात आपण कॅरेट म्हणजे काय व त्याचे प्रकार याबद्दल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी सोने खरेदी करत असतो. गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्याचे लग्न, वाढदिवस, किंवा कोणाला भेटवस्तू द्यायची असेल इत्यादीसाठी दागिने बनवताना आपण सोन्याला प्राधान्य देतो.

त्यामुळे जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो, तेव्हा दुकानदार आपल्याला विचारतो की किती कॅरेटचे सोने हवे आहे. म्हणजे 24 कॅरेट, 22 कॅरेट की 18 कॅरेट. पण तुम्हाला माहित आहे का हे 24 आणि 22 कॅरेट काय आहेत आणि या दोघांमध्ये काय फरक आहे? नसेल माहीत तर आज आपण याबाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

मित्रांनो, कॅरेटचा संबंध हा थेट शुद्धतेशी असतो. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते. त्यामुळे 24 कॅरेट सोने हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप मानले जाते. आणि 24 कॅरेट आणि 22 कॅरेट मधील फरक हा फक्त त्याच्या शुद्धतेचा आहे.

What is Gold Karat

What is Karat in Gold ?



कॅरेट म्हणजे काय

मित्रांनो, आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट वगैरे असे शब्द वापरतोय पण हे कॅरेट म्हणजे काय ते आपण आधी बघूया.

कॅरेट (karat) म्हणजे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. भारत सरकारने चार प्रकारकगे कॅरेट निर्धारित केले आहेत. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट. आणि या चार कॅरेट मध्येच आपल्याला सोन्याचे दागिने मिळतात. सोन्याच्या वस्तू मध्ये कॅरेट जितके जास्त तितके सोने शुद्ध असते. मग ते नाणी असो, बार असो किंवा मौल्यवान दागिने असो.

मित्रानो, प्रत्येक कॅरेटला एक हॉलमार्क नंबर दिलेला असतो. या नंबर वरून आपल्याला कळते की त्या दागिन्यां मध्ये सोन्याचे प्रमाण किती टक्के आहे.

(आधीच्या लेखात आपण हॉलमार्क म्हणजे काय असत, तो केव्हा सुरू झाले, त्याचे नवीन नियम या बद्दल माहिती बघितली आहे ते. इथे क्लिक तुम्ही वाचू शकता)

कॅरेटचे प्रकार

मित्रानो आता आपण कॅरेटच्या चार प्रकारांबद्दल अधिक जाणून घेऊ.

What is 24 KARAT GOLD?

24 कॅरेट

24 कॅरेट – 24k सोने हे शुद्ध सोने मानले जाते. म्हणजे त्यात 99.9 टक्के सोने वापरले गेले आहे, त्यात इतर कोणत्याही धातूंचे मिश्रण नसते. त्याचा एक वेगळा चमकदार पिवळा रंग असतो. हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप असल्याने, ते इतर कॅरेट पेक्षा अधिक महाग असते.

परंतू 24 कॅरेट हे सोन्याचे शुद्ध स्वरूप असल्याने ते मऊ असते आणि सहज वाकले जाते किंवा थोडा धक्का लागला की लगेच तुटते. त्यामुळे 24 कॅरेट चे दागिने जास्त प्रमाणात बनवले जात नाही. 24k सोने सामान्यतः सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी वापरले जाते.

22 कॅरेट

22 कॅरेट – 22k सोन्या मध्ये 91.6 टक्के शुद्ध सोने असते. उर्वरित टक्के चांदी, जस्त, निकेल व इतर धातूंचा समावेश असतो.

सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोने वापरले जाते. ज्यामुळे त्याला थोडा कडक पणा येतो. पण कोणतेही वजनदार सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोने वापरू शकता नाही. कारण जर तुम्ही 22 कॅरेट मध्ये हिऱ्याचे दागिने बनवले तर हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांचे वजन जास्त असते. त्या तुलनेत 22 कॅरेट सोने खूप मऊ व नरम असते आणि दागिन्यांना त्यांना घट्ट धरून ठेवणे त्यांच्यासाठी थोडे कठीण असते.

18 कॅरेट

18 कॅरेट – 18k च्या सोन्या मध्ये 75 टक्के शुद्ध सोन्याचा समावेश असतो आणि 25 टक्के इतर धातू असतात जसे की तांबे , झिंक, निकेल, चांदी इ.

हिऱ्याचे दागिने बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करणे अत्यंत योग्य आहे आणि दागिने बनवण्यासाठी जास्त करून 18 कॅरेट सोन्याला प्राधान्य दिले जाते. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट च्या तुलनेत 18 कॅरेट सोने स्वस्त आहे व परवडण्यासारखे आहे. रोजच्या वापरासाठी 18 कॅरेट सोन्या पासून बनवलेले दागिने योग्य असतात.

14 कॅरेट

14 कॅरेट – 14k सोन्यामध्ये 58.3 टक्के शुद्ध सोने वापरलेले असते व 41.7 टक्के इतर धातूंचे मिश्रण केलेले असते. याची किंमत इतर कॅरेट पेक्षा खूप कमी असते. यात इतर धातूंचे प्रमाण जास्त असल्याने ते अधिक बळकट व टिकाऊ असते. त्यामुळे रोज वापरण्यासाठी 14 कॅरेटचे सोन्याचे दागिने घ्यावे.

14 कॅरेट सोने कमी शुद्ध असल्याने त्याचा रंग फिकट पिवळा असतो. पण त्याच्या बळकट पणामुळे त्याला जास्त पसंती दिली जाते.

मित्रांनो, सोन्याच्या वरील सर्व प्रकारांचे स्वतःचे असे वेगळेपण आहे. फरक हा फक्त त्याच्या शुद्धतेचा आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचे दागिने घालणार आहात आणि ते किती वेळा घालणार आहात तसेच तुमच्या त्वचेची संवेदनशीलता, व तुमचे बजेट किती आहे तुम्हाला परवडणारे सोने कोणते आहे, या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही कोणत्याही प्रकरचे सोने खरेदी करू शकता.

तुम्हाला व्हाईट गोल्ड (White Gold) म्हणजेच पांढऱ्या सोन्याबद्दल माहिती आहे का ? इथे क्लिक करून वाचा.

तर मित्रांनो , अश्या प्रकारे आज आपण विविध प्रकारच्या कॅरेट बद्दल जाणून घेतले. आशा आहे की तुम्हाला वरील माहितीचा नक्कीच उपयोग होईल.

धन्यवाद !