MarathiGold (सोने)Popular Post

हॉलमार्क म्हणजे काय ? | HUID म्हणजे काय ? | What is Hallmark HUID number in Gold Jewelry

नमस्कार मित्रांनो आज आपण HUID म्हणजे काय? हॉलमार्क म्हणजे काय आहे? आपल्या देशात हॉलमार्क साठी कोणते नियम लागू केले आहेत? याविषयी माहिती बघणार आहोत.

मित्रांनो आपल्या देशात सोन्या-चांदीला खूप मोठी मागणी असते. तसेच आपल्या देशाची ज्वेलरी इंडस्ट्री ही जगातील सर्वात मोठ्या ज्वेलरी इंडस्ट्रीज पैकी एक आहे. आपल्या देशात सोन्या चांदीच्या दागिन्यांना खूप महत्त्व दिले जाते, आपण कोणत्याही खास प्रसंगी सोने-चांदी खरेदी करणे पसंत करतो. शुद्ध सोने किंवा शुद्ध चांदी हे 24 कॅरेट मध्ये मिळते. पण शुद्ध सोने किंवा चांदीची दागिने जास्त बनत नाहीत, कारण शुद्ध सोने हे खूप नरम असते. म्हणून त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा योग्य आकारात बनवण्यासाठी त्यात इतर धातूंची भर टाकली जाते.

What is Gold Hallmark in Marathi

What is Hallmark in Jewelry

हॉलमार्क म्हणजे काय

आता एखादी व्यक्ती जेव्हा दागिने खरेदी करायला जाते तेव्हा त्या व्यक्तीला माहीत पाहिजे की तो दागिना किती शुद्ध आहे व किती कॅरेटचा आहे, जेणेकरून ती व्यक्ती कोणत्याही फसवणुकी पासून वाचू शकेल. म्हणूनच यासाठी बी आय एस (BIS) ने 2000 साली सोने चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क ची सुरुवात केली.

मित्रांनो बी आय एस (BIS) म्हणजे Bureau of Indian Standards ज्याला भारतीय मानक ब्युरो असे देखील म्हटले जाते. जे भारत सरकारच्या अधिपत्या खाली काम करते. BIS ने निर्मित केलेल्या हॉलमार्क मुळे आपल्याला एखाद्या दागिन्यांची क्वालिटी व ते किती शुद्ध आहे हे कळते.



मित्रांनो, जेव्हा ज्वेलर्स एखादी ज्वेलरी बनवतात, तेव्हा त्या ज्वेलरीला म्हणजेच दागिन्यांना हॉलमार्क करण्यासाठी ते जवळच्या बीआयएस (BIS) अप्रुवल हॉलमार्क सेंटर मध्ये घेऊन जातात. त्या हॉलमार्क सेंटर मध्ये दागिन्यांना तपासले जाते, त्यांची क्वालिटी तपासली जाते व त्याप्रमाणे त्यावर हॉलमार्क केले जाते.

या होलमार्क मध्ये बी आय एस चा लोगो, त्या दागिन्याची प्युरुटी/शुद्धता, कॉलिटी त्याचे वजन, हॉलमार्क सेंटरचा नंबर व ज्वेलर्स चा आयडेंटिफिकेशन नंबर टाकला जात असे. पण आता BIS च्या नवीन नियमा नुसार हॉलमार्क मध्ये एच यु आय डी (HUID) चा समावेश करण्यात आला आहे.

What is HUID in Hallmark

HUID म्हणजे काय

HUID म्हणजे Hallmark Unique Identification. हा सहा अंकी नंबर असतो. जो दागिन्यांवर लिहिलेला असतो. ज्यामुळे बी आय एस त्या दागिन्याला ट्रेक करू शकतात. त्यामुळे त्या दागिन्याला एक वेगळी ओळख मिळते. हा सहा अंकी नंबर किंवा कोड हॉलमार्क करताना त्या दागिन्यांच्या कॅरेट सह लिहिला जातो. या नंबर मुळे बीआयएस ला कळेल की हॉलमार्क लागल्यावर त्या दागिन्यां मध्ये काही बदल केला गेला आहे की नाही.

मित्रांनो , BIS च्या आजच्या नवीन नियमा नुसार ज्वेलर्स ज्वेलरी बनवल्या नंतर जेव्हा हॉलमार्क करण्यासाठी हॉलमार्क सेंटर मध्ये जाईल तेव्हा हॉलमार्क सेंटरला या दागिन्यांची सर्व माहिती जसे की त्याची क्वालिटी, प्युरीटी, वजन ही सर्व माहिती बीआयएस च्या पोर्टल वर अपलोड करावी लागेल व त्यानंतर सहा अंकी नंबर बीआयएस त्या दागिन्याला देतो. HUID च्या नवीन नियमा नुसार ज्या दागिन्याचे वजन दोन ग्रॅम पेक्षा जास्त असेल, त्या दागिन्यात हॉलमार्किंग झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. पण हवे असल्यास तो दागिना वितळून पुन्हा नवीन दागिना तयार करून त्याला हॉलमार्किंग करता येते.

New rules of BIS Hallmark in India

हॉलमार्कचे नवीन नियम

मित्रांनो, 16 जून 2021 पासून देशात हॉलमार्क चे नवीन नियम लागू केले आहेत. ज्यामध्ये बीआयएस ने सर्व प्रकारच्या प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्क करणे अनिवार्य केल आहे. तसेच त्या ज्वेलर्सने आपले रेजिस्ट्रेशन करून बीआयएस चे लायसन्स घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणताही ज्वेलर्स हॉलमार्क चे दागिने विकू शकणार नाही. तसेच ज्वेलर्स ला आपल्या दुकानावर BIS चा लोगो लावावा लागेल. तसेच BIS चे लायसन्स दुकानात ठेवावे लागेल.

नवीन नियमा नुसार जर एखाद्या ज्वेलर्सने आवश्यक त्या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला त्या दागिन्याच्या पाच पट रक्कम दंड म्हणून भरावी लागेल, किंवा अशा परिस्थितीत अटक सुद्धा होऊ शकते.

नवीन नियमा नुसार प्रत्येक ज्वेलर्स ला सोन्याच्या प्रत्येक वस्तूवर हॉलमार्क करणे बंधनकारक केले आहे. दागिन्यांवर हॉलमार्क साध्या डोळ्यांनी दिसत नसल्यास ज्वेलर्स ला भिंगाचा उपयोग करावा लागणार आहे आणि ग्राहकांसाठी सुद्धा ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

मित्रांनो आजच्या नवीन नियमा नुसार काही सोन्याच्या वस्तूंवर हॉलमार्क करणे आवश्यक नाही त्यात सोन्याचे घड्याळ, फाउंटन पेन किंवा जडाऊ दागिन्यांचे काही प्रकार, अशा दागिन्यांवर हॉलमार्क नसले तरी चालणार आहे.

जुन्या दागिण्यावर हॉलमार्क नसेल तर

शिवाय जर तुमच्या कडे जुने दागिने असतील आणि जर त्यावर हॉलमार्क नसेल तर घाबरू नका. कारण त्यामुळे तुमच्या जुन्या दागिन्यांची किंमत कमी होणार नाही. तुम्हाला जर तुमचे जुने दागिने विकायचे असतील तर ज्वेलर्स तुमचे जुने दागिने घेऊन तेवढ्याच वजनाचे नवीन दागिने तुम्हाला बनवून देईल व त्यावर हॉलमार्किंग करून देतील.

मित्रांनो, जर तुम्हाला सोन्याचे दागिने बदलायचे असतील किंवा दोन वेगवेगळ्या दागिन्यांचा एकच दागिना बनवायचा असेल म्हणजे नवीन कॉम्बिनेशन करायचे असेल तर अशावेळी ज्वेलर्स लोकांना फक्त दोन ग्रॅम पर्यंत त्यात बदल करण्याची परवानगी दिली गेली आहे त्या पुढे बदल करायची असेल तर ज्वेलर्स लोकांना तो दागिना बनवून पुन्हा हॉलमार्किंग साठी हॉलमार्क सेंटरला जावे लागेल व त्यानंतरच तो दागिना ग्राहकाला विकता येईल.

what is Hallmark Benefits

हॉलमार्कचा फायदा

मित्रांनो भारतात सोने खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे अशा वेळी सोने खरेदी करताना ते सोनू शुद्ध आहे का, त्याची गुणवत्ता किती आहे, त्याची प्युरीटी किती आहे, त्याचे वजन किती आहे अशी प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. कधी कधी याबाबतीत अनेक लोकांची फसवणूक सुद्धा होते. म्हणूनच सोने खरेदी करताना ग्राहक सोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये त्यासाठी बीआयएस ने हॉलमार्क ची सुरुवात केली. हॉलमार्क करण्याचा हा एक खूप चांगला फायदा आहे.

मित्रांनो सध्या देशात फक्त 256 जिल्ह्यांमध्ये HUID चे नवीन नियम लागू केले गेले आहेत. ज्यामुळे त्या दागिन्या बद्दल प्रत्येक माहिती हि बीआयएस जवळ राहील.

याशिवाय जर तुम्ही दागिने विकायला गेलात तर तुम्हाला त्यामध्ये कोणतीही प्रकारची घट धरली जाणार नाही. तुम्हाला तुमच्या सोन्याची योग्य ती किंमत मिळते.

सोन्याचे दागिने खरेदी करताना हि काळजी घ्या

मित्रांनो जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करायला जाल तेव्हा बीआयएस नोंदणीकृत ज्वेलर्स कडूनच दागिने खरेदी करा किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या ज्वेलर्स कडे दागिने घ्यायला जाल तेव्हा त्याच्याकडे बीआयएस नोंदणी आहे का? त्याच्याकडे BIS चे लायसन्स आहे का? हे नक्की तपासा आणि नोंदणीकृत असलेल्या ज्वेलर्स कडून फक्त हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करा. तसेच ज्वेलर्स कडून त्या दागिन्याचे बिल घेण्यास विसरू नका. जर एखादा ज्वेलर्स तुम्हाला हॉलमार्क नसलेले दागिने स्वस्त किमतीत विकत असेल तर असे दागिने घेऊ नका.

हॉलमार्क नंबरचा अर्थ

प्रत्येक कॅरेटच्या सोन्याला एक हॉलमार्क नंबर दिला जातो. जसे की 22 कॅरेट साठी 916 नंबर असतो. 18 कॅरेट साठी 750 नंबर असतो. तर 14 कॅरेट साठी 585 नंबर असतो.

हॉलमार्क मध्ये लिहिलेल्या या नंबर वरून कोणत्या दागिन्यात किती टक्के सोने वापरले गेले आहे हे दिसून येते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या दागिन्यांवर 750 लिहिले असेल तर तो दागिना बनवण्यासाठी 75 टक्के सोने वापरले गेले आहे म्हणजेच तो सोन्याचा दागिना 18 कॅरेटचा आहे. उर्वरित इतर धातूंचा त्यात वापर केलेला असतो. ज्यामुळे सोन्याच्या दागिन्याला हवा तो आकार देता येतो.

तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हॉलमार्किंग मध्ये HUID चे किती महत्त्व आहे हे जाणून घेतले आशा आहे की तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल.