MarathiGold (सोने)

KDM 916 सोन्याचे दागिने: KDM गोल्ड आणि 916 गोल्ड यामधील फरक

नमस्कार मित्रांनो, आज आपण केडीएम (KDM) गोल्ड बद्दल जाणून घेणार आहोत. त्या सोबतच 916 गोल्ड आणि केडीएम गोल्ड मधील फरक सुद्धा बघणार आहोत.

मित्रांनो, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या देशाच्या समृद्ध अश्या इतिहासाचा सोन्याशी खूप जवळचा संबंध आहे. सोन्याच्या बाबतीत आपला देश खूप हौशी आहे. अगदी लहान बाळा पासून ते मोठ्यां पर्यंत सगळे सोने वापरतात. या सोन्याला आपल्या कडे खुप महत्व आहे. एक शुभ धातू म्हणून तसेच प्रेसटीज चा भाग म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सुद्धा सोन्या कडे पाहिले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का हे सोने म्हणजेच गोल्ड, BIS 916 गोल्ड आणि KDM गोल्ड अशा अनेक प्रकारांमध्ये येतो.

चला तर मग प्रत्येक प्रकारच्या सोन्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया.

KDM 916 Gold Jewellery - Difference between 916 Gold and KDM Gold Marathi

केडीएम गोल्ड (KDM Gold)

मित्रांनो, आपल्या भारतात जास्त करून 18 आणि 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो, हे कॅरेट सोन्याच्या शुद्धते विषयी माहिती देते. अनेक वेळा डिझाइनचे दागिने बनवत असताना त्या दागिन्या मधील अनेक छोटे छोटे भाग हे आधी घडवले जातात आणि नंतर त्यांना डाग दिला जातो म्हणजे त्यांचे सोल्डरिंग करण्यात येते. म्हणून जर आपल्याला काही वर्षांनी तो बनवलेला दागिना मोडून त्याचा जर नवीन दागिना बनवायचा असेल किंवा विकायचा असेल तर त्या दागिन्यांच्या वजनात घट धरली जाते.

काही वर्षा पूर्वी दागिन्यांना डाग देण्यासाठी म्हणजे सोल्डरिंग करण्यासाठी कॅडमियम या धातूचा वापर करायला सुरुवात झाली. कॅडमियम हे नाव उच्चार करायला कठीण वाटू लागल्या मुळे त्याचा उल्लेख KDM असे करण्यास सुरुवात झाली. कधी तरी दुकानाच्या बाहेर ‘KDM चे दागिने मिळतील’ अशी पाटी तुम्ही सुद्धा बघितली असेल.



याशिवाय कॅडमियम चा एक फायदा असा की ते सोन्या पेक्षा कमी तापमानाला वितळते, त्यामुळे दागिना मोडताना कॅडमियम सहज वेगळं करता येतं.

सोल्डरिंग करताना त्यात 92 टक्के सोने आणि 8 टक्के कॅडमियम वापरले जाते. हे कॅडमियम सोन्याचे दागिने आता KDM गोल्ड म्हणून ओळखले जातात.

मात्र, या कॅडमियम सोन्याचे काही दोष सुद्धा आहेत. KDM गोल्ड चे काम करणाऱ्या कारागिरांच्या आरोग्यासाठी कॅडमिअम हाताळणे घातक असल्याचे आढळून आले. कारण कॅडमिअम हा विषारी धातू आहे व जे कारागीर कॅडमिअम ने सोने घडवतात त्यांना या कॅडमिअमचा त्रास होतो. कधी कधी यामुळे कॅन्सर सारखा रोग होऊ शकतो. त्यामुळे नंतर भारतीय मानक ब्युरोने म्हणजेच BIS ने या केडीएम सोन्यावर व त्याच्या वापरावर बंदी घातली. पण काही ठिकाणी अजूनही कॅडमिअम चा वापर केला जातो.

916 गोल्ड (916 Gold)

मित्रांनो, 916 गोल्ड हा सोन्याचा एक प्रकार आहे. 916 हा अंक सोन्याची गुणवत्ता दर्शवत असतो. सामान्य भाषेत सांगायचे झाले तर या सोन्याला 22 कॅरेट सोने असे म्हणतात. 22 कॅरेट सोने म्हणजे त्यात 91.6 ग्रॅम शुद्ध सोने आणि बाकीचे इतर मिश्र धातु असतात. कॅरेट म्हणजे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक. जसे की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, आणि 14 कॅरेट सोने असते. हे सोने हॉलमार्क केलेले असतात व ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS कडून प्रमाणित केले जातात.

24 कॅरेट सोन्यासाठी, BIS 916 सोने, 23 कॅरेट सोन्याला BIS 958 ,असे म्हटले जाते. तसेच दागिन्यांची किंमत त्या त्या सोन्याच्या प्रमाणावर आधारित असते व तुम्ही जेव्हा दागिने घेता तेव्हा तुम्हाला त्या दागिन्या वर हे प्रमाणित केलेले चिन्ह म्हणजेच हॉलमार्क दिसेल.

Difference between 916 Gold & KDM Gold?

916 गोल्ड आणि KDM गोल्ड फरक

916 गोल्ड आणि KDM गोल्ड यात काय फरक आहे ? कोणत्या प्रकारचा गोल्ड चांगला आहे? – मित्रांनो, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कायद्या अंतर्गत सोने प्रमाणित केले जाते. सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन आणि चाचणी करून BIS हॉलमार्क केलेले 916 सोने हे दागिने सोन्याच्या शुद्धते बद्दल हमी देत असते. तसेच 916 शुद्धतेचे सोन्याचे दागिने बनवणारे ज्वेलर्स सुद्धा BIS द्वारे प्रमाणित असतात.

तर केडीएम गोल्ड म्हणजे कॅडमियम द्वारे सोल्डर केलेले सोन्याचे दागिने. भारतासह बर्‍याच देशांनी सुद्धा केडीएम सोन्या वर, कॅडमियम असल्या कारणाने बंदी घातली आहे. कारण याच्या विषारी धुरामुळे त्वचे वर हानिकारक परिणाम होतात. याला पर्याय म्हणून कॅडमियम धातू ऐवजी जस्त धातू आणि इतर धातू सोल्डरिंग साठी वापरण्यात येतात.

परंतु, अजूनही हॉलमार्क नसलेल्या सोन्याचे दागिने KDM सोने म्हणूनच ओळखले जातात. याचाच अर्थ, 916 गोल्ड आणि KDM गोल्ड या दोघांमधील मुख्य फरक म्हणजे 916 गोल्ड हे प्रमाणित आहे जे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता यांची हमी देते. तर KDM गोल्ड हे प्रमाणित नसल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता यांची कोणत्याही प्रकारची हमी देत ​​नाही. यावरून असे सांगता येईल की 916 गोल्ड हा KDM गोल्ड पेक्षा अधिक चांगला पर्याय आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण 916 गोल्ड व KDM गोल्ड या मधील फरक व त्यांच्या बद्दल जी माहिती बघितली ती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो.
धन्यवाद!