MarathiMaharashtrian Jewelry (महाराष्ट्रीयन दागिने)

हे 5 दागिने प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत !

दागिने म्हणजे मुलींची सर्वात आवडती गोष्ट. या दागिन्याची जडणघडण ही वेगवेगळी असते, त्यामुळेच प्रत्येक दागिना ही एक वेगळी कलाकृती असते, आणि प्रत्येक दागिन्यांची वेगवेगळी अशी खासियत असते.

आज समाजात दागिन्यांची क्रेझ खूप वाढली आहे मग ते सोने, चांदी, हिरे, मोती, असली किंवा नसली दागिने असो. या सोबतच इमिटेशन ज्वेलरी ला पण आज खूप मागणी आहे.

आपल्याकडे दागिने असणे म्हणजे आज काल एक प्रतिष्ठेचा प्रश्न मानला जातो. या अमूल्य दागिन्यात प्रत्येक मुलीचा जीव अडकलेला असतो. प्राचीन काळातही दागिन्यांना खूप महत्त्व दिले जात असे. फक्त राणी महाराणी नाही तर त्यांच्या दासी पण अनेक प्रकारचे दागिने परिधान करत असत. त्यात बांगड्या, बाजूबंद, सोन्याचे हार, वगैरे गोष्टी घालत असत त्यांचे दागिने पण खूप अनमोल असत. आजही आपल्या महाराष्ट्रात मराठमोळे दागिनयांचे खूप प्रकार पाहायला मिळतात यापैकी सर्व नाही पण काही दागिन्यांचे प्रत्येक मुलीच्या कलेक्शन मध्ये पाहायला मिळतत.

अगदी रोज घालण्यासाठी नसले तरी काही खास प्रसंगी घालण्यासाठी काही महत्वाचे दागिने हे प्रत्येक मुलीकडे असतात.

आजच्या लेखात आपण असेच दागिन्यांचे काही प्रकार पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की ते कोणते पाच मराठमोळे दागिने आहेत जे प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायला हवेत.



बोरमाळ माहिती

Bormala information in Marathi

बोरमाळ

बोरांच्या आकारा सारखी दिसणारी ही मण्यांची माळ बोरमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. बोरमाळ हा गळ्यात घालायचा दागिना आहे. बोरमाळ हे सोन्याची किंवा चांदीची अशा दोन्ही प्रकारात मिळते. पूर्वी बायका एक सरीची बोरमाळ घालत असे पण आता बाजारात दोन किंवा त्यापेक्षा जास्त सरींची बोरमाळ भेटते. हा दागिना पारंपारिक जरी असला तरी तो तुम्ही कुर्ता, पंजाबी ड्रेस किंवा सहावारी साडी किंवा एखाद्या ट्रेंडी टॉप वर घालू शकता. बोरमाळ हा दागिना कमीत कमी सोन्यात भरीव आणि उठून दिसणारा दागिना आहे. त्यामुळे हा दागिना तुमच्या कडे असायलाच हवा.

ठुशी माहिती

Thusi information in Marathi

ठुशी

ठुशी हा खूप पारंपरिक दागिना आहे, पण तरीही आज प्रत्येक घरात ठुशीच दागिना हा बघायला मिळतो. तुम्ही साडी नेसत असाल किंवा नसाल तरीही तुमच्याकडे ठुशी ही असायला हवी, कारण फक्त साडी, किंवा पैठणी नाही तर एखाद्या सुंदर ड्रेसवर किंवा घागरा-चोळी, अगदी डिझायनर ड्रेस वर सुद्धा ठुशी उठून दिसते.

ठुशी हा दागिना एवरग्रीन असा दागिना आहे. सध्या ठुशीचे खूप वेगवेगळे डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत. हा दागिना गळ्या भोवती घातला जातो. ठुशीच्या मध्यभागी कधी कधी एखादे रत्न किंवा सोन्याचे पान देखील लावलेले असते व बाजूने गोल मणी ठासून भरलेली असतात, त्यामुळे ती दिसायला खूप सुंदर दिसते.

मण्यांच्या लहान मोठ्या आकारामुळे हा दागिना खूप नाजूक, उठावदार दिसतो व मोठ्या सोबतच लहान मुलींनाही हा दागिना खूप शोभून दिसतो. कोणत्याही वयोगटाच्या मुलीवर तो खुलून दिसतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही समारंभासाठी, दागिन्यांच्या खरेदी मध्ये सर्वात पहिले ठुशीलाच प्राधान्य असते. हा दागिना घातल्यावर त्यासोबत इतर कोणताही दागिन्याची गरज पडत नाही. पैठणी, कांजीवरम व इतर भरर्जरी साड्यांवर ठुशी हा दागिना घातल्यावर खूप छान दिसतो.

ठुशीची हवी ती डिझाईन तुम्ही तयार करून घेऊ शकता. वजनाला हलका आणि दिसायला भारदस्त असा हा ठुशीचा दागिना इतर सर्व दागिन्यांची कमतरता पूर्ण करून टाकतो. म्हणूनच या दागिन्याला खूप जास्त मागणी आहे.

तोडे माहिती

Tode information in Marathi

तोडे

तोडे हा हातात घालण्याचा दागिना आहे व तो बांगड्या सारखाच असतो. प्युअर सोन्यात म्हणजेच 24 कॅरेट सोन्या मध्ये हा दागिना बनवला जातो, आणि हा दागिना बांगडयांपेक्षा ही दिसायला जाड असतो. शिवाय हिरव्या बांगड्या सोबत तोडे घातल्यावर खूप उठून दिसतो. या दागिन्यांवर सुरेख असे नक्षीकाम केलेले असते व ते एका बाजूने लॉक करता येते.

तुम्हाला जर पारंपारिक दागिने घालायला आवडत असेल तर तोडे हे तुमच्याकडे असायला हवे . काठापदराच्या साडीवर हिरव्या बांगड्या सोबत हा दागिना घातल्यावर रूप खुप खुलून दिसते.

नथ माहिती

Nath information in Marathi

नथ

नथ हा एक असा दागिना आहे जी प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. पारंपारिक असला तरीही आज प्रत्येक स्त्री किंवा मुलगी नथ घालते. आजच्या काळात फक्त पारंपरिक वेशभूषा वर किंवा सणासुदीलाच नाही तर छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा, कोणत्याही वेशभूषेवर मग ती साडी असो किंवा नसो कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर नथ घातली जाते. ढोल ताशा पथका मध्ये तर फेट्या सोबत नथ घालणे ही एक क्रेझ बनली आहे.

नथ ही सोन्याची किंवा चांदीची, हिऱ्याची किंवा मोत्याची असू शकते. त्यातल्या त्यात मोत्यांच्या नथीला जास्त पसंती दिली जाते.

पूर्वीच्या काळात नथीला सौभाग्याचे लक्षण समजले जायचे आणि आजही ती परंपरा तशीच चालू आहे. शिवाय मॉडर्न फॅशन म्हणूनही ‘नथीचा नखरा’ हा सोशल मीडिया वरही ट्रेंड झाला आहे. अशी ही नथ महाराष्ट्रीयन दागिन्यां मध्ये खूप नावाजलेला आहे.

पूर्वी लहानपणीच मुलींचे नाक टोचले जायचे. पण आता बाजारात प्रेसच्या / दाबण्याच्या / क्लिप असलेल्या नथ ही मिळतात त्यामुळे नाक टोचलच पाहिजे असे काही नाही. शिवाय नवीन प्रकारच्या नथी या आकाराने व वजनाने हलक्या असतात.

लग्नात नवरीसाठी तर नथ हा खूप महत्त्वाचा दागिना मानला जातो. पण लग्न झालेले असो किंवा नसो प्रत्येक मुलीकडे नथ हा दागिना असायलाच हवा आणि तो असतोच.

बाजूबंद माहिती

Bajuband information in Marathi

बाजूबंद

मित्रांनो, नवरीच्या पेहरावा मध्ये दागिन्यांचे खूप महत्त्व असते. लग्नात आजकाल बहुतेक वेळा पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली जाते आणि त्यानुसार पारंपारिक दागिने घातले जातात या दागिन्यां मध्ये बाजूबंद आवर्जून घातले जाते.

बाजूबंद हा स्त्रियांनी हाताच्या दंडावर घालण्याचा एक दागिना आहे. हा बाजूबंद सोने, हिरे, मोती, चांदी अशा विविध प्रकारच्या धातू पासून बनलेला असू शकतो. हा अतिशय सुरेख असा दागिना आहे. मोत्यांमध्ये बनवलेले बाजूबंद जास्त प्रमाणात वापरले जाते.

तर बाजूबंद हा दागिना कितीही जुना वाटत असला तरी त्याची फॅशन कधीही संपलेली नाही. म्हणून तो तुमच्याकडे असायलाच हवा.

तर मित्रांनो हे पाच प्रकारचे दागिने तुमच्याकडे असायलाच हवेत. आणि जर नसतील तर ते तुम्ही अवश्य घ्यावे.
धन्यवाद!

Tags – Maharashtrian Jewellery, Bormal Mahiti, Bormala Mahiti, Thushi mahiti, Tode Mahiti, Nath Mahiti, Nose pin, Bajuband, Bajuband Mahiti, Vaki Mahiti, Vaki Mhanje Kay, महाराष्ट्रीयनदागिने