ऑक्सिडाईज ज्वेलरी म्हणजे काय ? महाराष्ट्रीयन ऑक्सिडाईज दागिने | Oxidised Jewellery
नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑक्सिडाईज ज्वेलरी माहिती, महाराष्ट्रीयन ऑक्सिडाईज ज्वेलरी, ऑक्सिडाईज दागिन्यांची काळजी कशी घ्यावी, हे दागिने खरेदी करताना काय काळजी घ्यावी, इत्यादी बद्दल जाणून घेणार आहोत.
आज काल प्रत्येक गोष्टीत आपण फॅशनचा विचार करतो. ही फॅशनही फक्त कपड्यां पुरतीच मर्यादित नाही राहिली तर त्यासोबत बऱ्याच गोष्टी येतात. त्यातल्या त्यात दागिन्यांच्या बाबतीत तर रोज नवनवीन फॅशन ट्रेंड येत असतात. दागिने म्हटल्यावर आपल्या समोर येतात ते आपले पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने. जास्त करून हे दागिने आपण सोन्याचे, चांदीचे किंवा हिऱ्याचे वापरतो. परंतु नवीन ट्रेंड नुसार वेस्टर्न दागिने सुद्धा तितकेच महत्त्वाचे झाले आहेत. सध्या बाजारात प्रचंड मागणी असणारे दागिने म्हणजे ऑक्सिडाईज दागिने.
या ऑक्सिडाईज दागिन्यांची तरुणींमध्ये खूप क्रेझ आहे. प्रत्येक आऊटफिट वर ऑक्सिडाईज ज्वेलरी वापरली जाते.

What is Oxidized Jewellery?
हे दागिने स्टर्लिंग चांदीचे बनवलेले असतात. (स्टर्लिंग चांदी म्हणजे चांदी आणि इतर धातूंचे मिश्रण. जसे की तांबे, जर्मेनियम, जस्त, प्लॅटिनम, सिलिकॉन आणि बोरॉन. ही स्टर्लिंग चांदी शुद्ध चांदीपेक्षा मजबूत असते. म्हणून दागिने किंवा इतर वस्तू बनवताना त्याचा वापर केला जातो.) तस पाहिलं तर ऑक्सिडाईज ज्वेलरीला थोडाफार काळपटपणा असतो. आणि हा काळपटपणा सिल्वर ची सल्फर सोबत रिऍक्शन होऊन सिल्वर सल्फाइड तयार झाल्यामुळे येतो.
Maharashtrian Oxidised Jewellery
महाराष्ट्रीयन ऑक्सिडाइज्ड दागिने
मित्रांनो, स्वस्त आणि टिकाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑक्सिडाईज पॅटर्न मध्ये आपले पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. नेहमीपेक्षा हट के लुक देणाऱ्या या ऑक्सिडाईज दागिन्यांची सध्या खूप फॅशन आहे. लग्न कार्यात तसेच विविध सणावाराला किंवा पार्टीझ मध्ये सुद्धा या ऑक्सिडाईज दागिन्यांना खूप पसंती मिळते. महाराष्ट्रीयन ऑक्सिडाईज दागिने मध्ये खूप डिझाईन्स व प्रकार यात उपलब्ध आहेत. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊ…
Oxidised Thushi
ऑक्सिडाईज ठुशी
मित्रांनो ठुशी म्हणजे ठासून भरलेले गोल मणी. हा एक पारंपरिक दागिना आहे. हा दागिना पूर्वी राजघराण्यांमध्ये प्रसिद्ध होता. यात मधोमध एखादे सोन्याचे पान किंवा गुलाबी रंगाचा माणिक लावलेला असतो. सध्या बाजारात ऑक्सिडाईज प्रकारात ठुशी बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतात. याची किंमत अंदाजे 250 रुपयांपासून सुरू होते.
Oxidised Nath
ऑक्सिडाईज नथ
बाजारात आपल्या पारंपरिक नथी ऑक्सिडाईज रुपात मिळतात. या नथी मध्ये स्टोन्स देखील वापरले जातात. खास करून गुलाबी, लाल व हिरव्या रंगाचा स्टोन अधिक वापरला जातो. चंदेरी रंगामध्ये हे स्टोन खूप उठून दिसतात. या स्टोन्स मुळे हा दागिना अधिक जास्त उठावदार दिसतो. ऑक्सिडाईज नथीचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. याची किंमत अंदाजे 250 ते 300 रुपया पासून सुरू होते.
Oxidised Kolhapuri Saaj
ऑक्सिडाईज कोल्हापुरी साज
हा दागिना सर्वांना खूप आवडतो आणि ऑक्सीडाइज्ड स्वरूपात हा दागिना खूपच फेमस झाला आहे . शॉर्ट, मिडीयम व लॉंग अशा अनेक प्रकारात आपल्याला या ऑक्सिडाईज कोल्हापुरी साज मध्ये बघायला मिळतात . या ऑक्सिडाईज कोल्हापुरी साज ची अंदाजे किंमत 500 ते 600 रुपयां पासून सुरू होते.
Oxidised Bormal
ऑक्सिडाईज बोरमाळ
लहान बोराच्या आकाराची माळ म्हणजे बोरमाळ. गोल तसेच लांबट, चौकोनी मण्यांची ही माळ बनवली जाते. पूर्वी यात फक्त एकच पदर असायचा पण आता दोन किंवा तीन पदरी बोरमाळ जास्त प्रमाणात वापरली जाते. या ऑक्सीडाइज्ड बोरमाळची अंदाजे किंमत 500 रुपये पासून सुरू होते.
Oxidised Bugadi
ऑक्सिडाईज बुगडी
हा दागिना महाराष्ट्रातील पारंपारिक दागिना आहे. याला दोन्ही बाजूने हुक असतात. ऑक्सिडाईज रुपात बुगडी च्या अनेक व्हरायटी मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. या ऑक्सिडाईज बुगडी ची किंमत 250 ते 300 रुपये पासून सुरू होते.
Oxidised Tanmani
ऑक्सिडाईज तनमणी
तनमनी हा गळ्यात घालायचा दागिना आहे. लॉंग व शॉर्ट नेकलेस मध्ये सुद्धा ऑक्सिडाईज तन्मणी उपलब्ध आहेत. तन्मणी पेंडेंटच्या अनेक डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळतात. पारंपारिक पोशाखावर हा दागिना खूप उठून दिसतो . हा दागिना ऑक्सिडाईज रूपात बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
Oxidised Mangalsutra
ऑक्सिडाईज मंगळसूत्र
मित्रांनो मंगळसूत्र हे प्रत्येक स्त्री च्या गळ्यात असतेच. पण सोन्याचे चांदीचे मंगळसूत्र वापरणे ही नेहमीची सामान्य गोष्ट झाली आहे. सध्या ऑक्सिडाईज मंगळसूत्र वापरण्याचा ट्रेंड खूप चालला आहे. जर तुम्हाला वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही हे मंगळसूत्र वापरू शकता.
ऑक्सिडाईज मंगळसूत्र मध्ये अनेक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. तसेच या मंगळसूत्राच्या पेंडेंट मध्ये विविध रंगाचे स्टोन्स देखील वापरले जातात. ज्यामुळे दिसायला हे मंगळसूत्र खूपच नाजूक, सुंदर व युनिक दिसते.
Oxidised Bangadi
ऑक्सिडाईज बांगड्या
तुमच्या बांगड्या जर ऑक्सिडाईज रुपात असतील तर तुमच्या हाताची शोभा आणखी वाढण्यास मदत होईल. या बांगड्या तयार करताना त्याची डिझाइन, त्याची जाडी आणि त्याची पॉलिश यांचा बारकाईने विचार केला जातो. जर तुम्ही साडीवर ऑक्सिडाईज बांगड्या घालणार असाल तर कमी जाडीच्या बांगड्या निवडा आणि इतर कपड्यांवर जास्त जाडीच्या बांगड्या घालाव्यात, त्यामुळे तुमच्या पेहरावा नुसार या ऑक्सिडाईज बांगड्या खूप उठून दिसतील व तुम्हाला एक वेगळाच ट्रेंडी लुक मिळेल.
Oxidised Painjan
ऑक्सिडाईज पैंजण
पैंजण हा सर्व स्त्रियांचा आवडता दागिना आहे. चांदी पेक्षा ऑक्सिडाईज पैंजण वापरल्याने पाय अतिशय सुंदर दिसतात व तुमच्या लुक मध्ये एक वेगळेपणा येतो. हे ऑक्सिडाईज पैंजण तुम्ही कोणत्याही कपड्यांवर घालू शकता.
Oxidised Choker
ऑक्सिडाईज चोकर
ऑक्सिडाईज चोकर चा बाजारात नवा ट्रेण्ड आला आहे. याची डिझाईन खूप वेगळी व उठावदार दिसते. ऑक्सिडाईज चोकर गळ्यात खूप शोभून दिसतात. यामध्येही बाजारात तुम्हाला खूप व्हरायटीज बघायला मिळतील.
Oxidised Ring
ऑक्सिडाईज अंगठी
ऑक्सिडाईज दागिन्यांचा लुक पूर्ण करायचा असेल तर ऑक्सिडाईज अंगठी तर असायलाच हवी. या ऑक्सिडाईज अंगठ्या तुम्हाला हव्या त्या डिझाइन मध्ये बाजारात मिळतील. इंडो-वेस्टर्न किंवा एखाद्या काठापदराच्या साडीवर किंवा खणाच्या साडीवर सुद्धा इतर ऑक्सिडाईज दागिने बरोबर ही ऑक्सिडाईज अंगठी खूप शोभून दिसते.
ऑक्सिडाईज दागिन्यांची काळजी कशी घ्यावी
मित्रांनो ऑक्सिडाईज दागिने वापरायला खूप सोपे असले तरी या दागिन्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, नाहीतर हे दागिने लवकर काळे पडू लागतात. ऑक्सिडाईज दागिने नेहमी बंद डब्यात कापसाने झाकून ठेवावे. सूर्याच्या प्रकाशा पासून हे दागिने दूर ठेवावे. तसेच हे दागिने घातल्यावर पाण्याशी कमीत कमी संपर्क ठेवावा.
ऑक्सिडाईज दागिने खरेदी करताना काय काळजी घ्यावी
ऑक्सिडाईज दागिने घेताना सर्वात आधी त्याची गुणवत्ता तपासायला हवी अन्यथा त्यामुळे त्वचेची एलर्जी किंवा रॅशेस होऊ शकतात. हे दागिने खरेदी करताना एखाद्या विश्वसनीय दुकानातूनच खरेदी करा. जर तुम्ही ऑनलाइन ऑक्सिडाईज दागिने खरेदी करणार असाल तर ते दागिन्या बद्दल दिलेली माहिती नीट काळजी पूर्वक वाचा.
तर मित्रांनो, कमी दरात परफेक्ट लुक देणाऱ्या अशा ऑक्सिडाईज दागिन्यांना आजच्या काळात खूप मागणी आहे. हे दागिने साडी, कुर्ता, वेस्टर्न आऊटफिट, लेहेंगा, इंडो वेस्टर्न, जीन्स, ब्लेझर अशा कुठल्याही कपड्यांवर अगदी शोभून दिसतात. या दागिन्यांची किंमत देखील दीडशे रुपयांपासून ते बारा ते पंधरा हजार रुपयां पर्यंत असू शकते.
अशा या नाजूक सुंदर व ट्रेंडी ऑक्सिडाईज दागिने बद्दल आज आपण जाणून घेतले. आशा आहे की तुम्हाला हा आजचा लेख नक्की आवडेल. तुमच्याकडे यापैकी जर एखादा ऑक्सिडाईज दागिना नसेल तर तो तुम्ही अवश्य घ्या.
धन्यवाद!