विविध प्रकारचे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने | Maharashtrian Pearl Jewellery Types
नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील विविध प्रकारचे मोत्याचे दागिन्यां बद्दल माहिती बघणार आहोत.
मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आपला महाराष्ट्र हा एक समृद्ध आणि आपल्या सांस्कृतिक वारशासाठी खुप प्रसिद्ध आहे. या सांस्कृतिक वारश्यात आपल्या मराठी दागिन्यांना खूप महत्व दिले जाते. आणि आपल्याला तर माहीत आहेच की महिलांचे दागिन्यांशी खुप अतूट नाते असते. हेच आपले पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने स्त्रीचे स्वरूप पूर्ण करण्यास मदत करतात.
महाराष्ट्रीयन ज्वेलरी किंवा दागिने अतिशय सुंदर आणि शोभिवंत दिसतात. या दागिन्यांची प्रत्येकाला भुरळ पडत असते. हे दागिने सोन्यात, चांदीत, हिऱ्यात अशा अनेक प्रकारात मिळतात. मोत्यां मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे दागिने मिळतात.
चला तर मग आज आपण मोत्यांचे विविध प्रकारचे दागिने पाहूया.
Kudi Jewellery information in Marathi
कुडी / कुड्या
कुड्या हा एक पारंपरिक मराठी दागिना आहे व तो जास्त करून सोन्याच्या किंवा मोत्यांच्या मणांनी बनवलेला असतो. हा दागिना कानात घातला जातो. कुड्यांचा आकार शक्यतो गोल व फुलांसारखा असतो. पेशव्यांच्या काळात हा दागिना खूप प्रसिद्ध झाला असे म्हटले जाते. या शिवाय याला सौभाग्य अलंकार म्हणू शक्यतो. सहावारी किंवा नववारी साडी वर हा दागिना घातला जातो.
Bangadi Jewellery information in Marathi
बुगडी
हा एक पारंपरिक दागिना आहे. याला कानाच्या वरच्या वक्र भागात घातला जातो. बुगडीला जास्त करून मुली लग्नाच्या दिवशी घालतात. मोती आणि सोन्याच्या कॉम्बिनेशन मध्ये बुगडी हा दागिना बनवला जातो. या दागिन्याला दोन्ही बाजूने हुक असते. आताच्या मॉडर्न काळात सुंदर डिझाइन्स मध्ये आणि डायमंड किंवा ऑक्सिडाइज्ड बुगडू सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
Ring Jewellery information in Marathi
अंगठी
मोत्याची अंगठी बनवताना शक्यतो लहान किंवा मोठ्या आकाराचे मोती निवडले जातात. हा दागिना हाताच्या बोटात घालतात. प्राचीन काळापासून अंगठी घालण्याची रीत आहे. पुरुष असो किंवा स्त्री कोणीही मोत्याची अंगठी घालू शकतात. सोने व मोतीच्या कॉम्बिनेशन मध्ये बनवलेली अंगठी घातल्याने घालणाऱ्या व्यक्तीला एक रॉयल लुक मिळतो. या मोत्याच्या अंगठ्या वेगवेगळ्या आकारात किंवा डिझाईन्स मध्ये बाजारात उपलब्ध आहेत. मोत्याची अंगठी हे नेहमी बारीक आकाराचे मोती असलेली घ्यावी.
Nath Jewellery information in Marathi
नथ
मोत्याची नथ हा महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिना आहे. जो कोणत्याही काळात खूपच ट्रेंडी दिसतो. या शिवाय कोणत्याही स्त्रीचा शृंगार नथी शिवाय अपूर्ण असतो. नऊवारी साडी सोबत किंवा एखाद्या काठापदराच्या साडी वर किंवा आज- काल नवीन फॅशन नुसार जीन्स-टॉप वर सुद्धा नथ घातली जाते. लग्न, पूजा किंवा आजकाल फेट्या सोबत सुद्धा नथ घातली जाते. या नथी मध्ये मध्यभागी काही इतर रंगाचे स्टोन लावलेले असतात.
आताच्या आधुनिक काळात मोत्या सोबतच अनेक प्रकारच्या क्लासिक फॅन्सी डिझाईनर नथ बाजारात उपलब्ध आहे. तुमचे नाक टोचलेले असो किंवा नसो दोन्ही साठी नथ उपलब्ध आहेत. नाक टोचलेले नसल्यास प्रेस नथ किंवा क्लिप असलेली नथ तुम्ही वापरू शकता. अशी ही महाराष्ट्रीय नथ महिलांचा खूपच महत्त्वाचा आणि आवडीचा दागिना आहे.
Tanmani Haar Jewellery information in Marathi
तन्मणी हार
हा हार मोत्यांचा बनवलेला असतो व तो गळ्यात घातला जातो. या हारामध्ये मोत्यांच्या सरीं सोबतच पेंडेंट सुद्धा घातले जाते. या हारात मोत्यांच्या मण्यांचे तीन ते चार लेयर असतात. बाजारात खूप सुंदर डिझाईन्स व पॅटर्न मध्ये हा हार उपलब्ध आहे. याला पेशवाई दागिना म्हणूनही ओळखले जाते.
Bangadi Jewellery information in Marathi
बांगडी
मोत्याच्या बांगड्या या प्राचीन काळापासून वापरल्या जातात. महाराष्ट्रीयन स्त्रीयांचा हा एक आवडता दागिना आहे. मोत्याच्या बांगड्या या शक्यतो हिरव्या बांगड्या सोबत घातल्या जातात, कारण त्या बांगड्या हिरव्या रंगा सोबत खूप उठून दिसतात. मोत्याच्या बांगड्याच्या बाजारात खूप डिझाइन्स उपलब्ध आहेत. असे एकही घर दिसणार नाही जिथे मोत्याच्या बांगड्या नाहीत. लग्नाच्या प्रसंगी किंवा सणावाराला या मोत्याच्या बांगड्या काठपदराच्या साडी सोबत घालण्यात येतात. शिवाय या बांगड्या हाताची शोभा वाढवतात.
Bajuband Jewellery information in Marathi
बाजूबंद
बाजूबंद हा दंडामध्ये घालण्याचा दागिना आहे. सोन्यात मोती जडवून हा दागिना बनवला जातो. मोत्यांचा वापर करून यात नक्षीकाम केलेली असते. मोत्या सोबत यामध्ये माणिक किंवा इतर स्टोन्स देखील वापरलेले किंवा बसवलेले असतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स यामध्ये उपलब्ध आहेत. नऊवारी साडीवर हा दागिना आवर्जून घातला जातो.
Moti Haar Jewellery information in Marathi
मोत्याचा हार
नऊवारी साडी असो किंवा सहावारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची साडी असो त्यावर मोत्याचा हार तुमची शोभा नक्की वाढवेल. या हारामुळे तुम्हाला एक वेगळाच लुक मिळेल. मोत्याचा हार दोन किंवा तीन सरींचा असतो. कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभात किंवा नेहमीच्या वापरासाठी सुद्धा मोत्याचा हार तुम्ही घालू शकता.
मोत्याचा हार दिसायला खूप सुंदर असतो. त्याच्या मध्यभागी हिऱ्याचा उपयोग करून पेंडेंट लावलेले असते. त्यामुळे ते अजूनच मोहक दिसतो. डिझायनर ड्रेस वर सुद्धा मोत्यांचा हार शोभून दिसतो.
Choker Jewellery information in Marathi
चोकर
आजकाल बाजारात चोकर चा ट्रेंड खूप प्रसिद्ध आहे. मोत्यांमध्ये अनेक प्रकारची डिझाइनर चोकर तुम्हाला बाजारात बघायला मिळतील. मोत्यांचा चोकर हा दिसायला खूप अप्रतिम दिसतो. काठापदराच्या साडीवर शिवाय मॉडर्न कपड्यां वरही तुम्ही चोकर वापरू शकता. तुमच्या दागिन्यांच्या कलेक्शन मध्ये चोकर हा दागिना असायलाच हवा, कारण हा स्त्रियांचा आवडता दागिना मानला जातो. चोकर हा गळ्यातील हार अनेक वर्षांपासून वापरला जाणारा दागिना आहे.
Kamarband Jewellery information in Marathi
कमरबंद
कमरबंद हा दागिना शक्यतो साडी वर घातला जातो. मोती आणि इतर रत्नांचा वापर करून याला सोन्यात किंवा चांदीत बनवलेले असते. लग्नाच्या प्रसंगी या दागिन्यांना जास्त पसंती दिली जाते. कमरबंद हा एक सरीत किंवा जास्तीत जास्त सरींमध्ये बाजारात उपलब्ध आहे. दक्षिण भारतात हा दागिना जास्त प्रसिद्ध आहे.
चिंचपेटी
चिंचपेटी हा मोत्याचा दागिना गळ्या लगत घातला जातो व हा दागिना गर्दीतही खूप उठून दिसतो. हा दागिना घातल्याने सौंदर्यात अजूनच भर पडते. हा हार शक्यतो नऊवारी साडी वर घातला जातो. एखाद्या काठ पदराच्या साडीवर सोन्याचे मंगळसूत्र व गळ्याला चिटकून असणारी चिंचपेटी; फक्त एवढे दागिने घातले तरी सुद्धा खूप पुरेसे असतात. याशिवाय दुसरे दागिने नसतील तरी रूप अधिक खुलून दिसते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारचे मोत्यांचे महाराष्ट्रीयन दागिने प्रत्येक कार्यक्रमात किंवा समारंभात सोन्यापेक्षा ही उठून दिसतात. शिवाय ज्या लोकांना दागिने घालायला आवडतात असे लोक राजेशाही थाट दाखवणाऱ्या मोत्यांच्या दागिन्यांना अधिक पसंती देतात.
अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रीयन मोत्यांच्या दागिन्यां बद्दल माहिती बघितली. आशा आहे की तुम्हाला आजचा लेख नक्कीच आवडला असेल.
धन्यवाद !
Tags – Maharashtrian Moti Dagine, Maharashtrian Pearl Jewellery Mahiti, Maharashtrian Moti jewelry, Maharashtrian Moti Jewellery, Maharashtrian Moti Jewellery Information, Maharashtrian Pearl Jewellery Information, महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने माहिती, महाराष्ट्रीयन मोती ज्वेलरी माहिती, मोती ज्वेलरी माहिती, Moti Jewellery Information in Marathi, Moti Jewellery Info in Marathi