जेम स्टोन्स प्रॉपर्टीझची माहिती | रत्नांच्या गुणधर्माची माहिती
नमस्कार मित्रांनो, आज आपण जेम स्टोन्स च्या प्रॉपर्टीझ म्हणजेच रत्नांचे गुणधर्म बघणार आहोत.
मित्रांनो, रत्ने तर तुम्हाला महितच आहेत. जी अनेक प्रकारची असतात. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये, वेगवेगळे रंग, आकार, वगैरे असतात. पण रत्ने घेताना, रत्नांची ओळख ही त्यांच्या काही गुणधर्मांवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला त्यांचे गुणधर्म ( Properties) माहीत असायला हवेत.
मित्रांनो, स्टोन्स च्या प्रॉपर्टीझ साधारणतः तीन प्रकारच्या असतात.
Properties of Gem Stones
- ऑप्टिकल प्रॉपर्टीझ ( Optical Properties )
- फिझिकल प्रॉपर्टीझ ( Physical Properties )
- केमिकल प्रॉपर्टीझ ( Chemical Properties )
स्टोन हा नैसर्गिक असो किंवा कृत्रिम, त्यांची फिझिकल, केमिकल आणि ऑप्टिकल प्रॉपर्टीझ या शक्यतो सारख्याच असतात. आपण एक एक करून सगळ्यांबद्दल जाणून घेऊया.
Hardness (कठिणता किंवा कठोरता)
हार्डनेस म्हणजे एखाद्या स्टोनची कठोरता. तो स्टोन किती प्रमाणात घर्षण झेलू शकतो जातो यावर त्याची कठोरता ठरते. स्टोन जेवढा कठोर/कडक तेवढी त्याची (घर्षण) घासण्याची क्षमता जास्त जास्त असते, म्हणजेच स्टोन जितका जास्त हार्ड असेल तितका तो कमी घासला जातो.
स्टोन चा कठिणता ही मोह (Moh) च्या स्केल ने मोजली जाते.
उदा. जसे की, डायमंड ची हार्डनेस 10 Moh आहे, रुबी ची हार्डनेस 9 Moh आहे, क्यूबीक झिरकोनिया ची हार्डनेस 8.5 Moh आहे.
म्हणजे जर आपण डायमंड आणि रुबी ला जर एकमेकांवर (घर्षण) घासले तर रुबी लवकर घासला जाईल पण डायमंड च्या कठोरतेमुळे तो घासला जाणार नाही. यावरून असे समजते की, हार्डनेस जितकी जास्त तितका तो स्टोन कमी घासला जाईल, व हार्डनेस जितका कमी तेवढा तो स्टोन जास्त घासला जाईल.
Luster (चमक)
मित्रांनो, सोप्या शब्दात सांगायचे झाले तर स्टोन जितका जास्त हार्ड तितकी त्याची चमक जास्त असते. तसेच एखाद्या स्टोन ची चमक, ही त्या स्टोनच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. स्टोनला योग्य पॉलिशिंग आणि फिनिशिंग केल्याने त्याची चमक अधिक दिसून येते.
याशिवाय परावर्तित प्रकाशात एखाद्या स्टोनची चमक ही त्याच्या पृष्ठभागावरून किती प्रमाणात प्रकाश परावर्तित होतोय यानुसार निर्धारित केली जाते.
Specific Gravity (विशिष्ट गुरुत्व)
मित्रांनो, प्रत्येक स्टोनची आपापली ग्राव्हिटी म्हणजेच density (डेन्सीटी) किंवा घनता असते. तसेच स्टोनची gravity किंवा डेन्सीटी/ घनता ही पाण्याच्या घनतेच्या तुलनेत मोजली जाते. प्रत्येक स्टोनची घनता ही पाण्याच्या तुलनेत दोन ते चार कधी कधी सहा पट जास्त असते. आणि प्रत्येक स्टोनची घनता किंवा विशिष्ट गुरुत्व हे decimal numbers मध्ये मोजले जाते. उदाहरणार्थ, डायमंड साठी ही घनता 3.52 असते, तर कॉरंडम साठी घनता 4.00, आणि क्वार्ट्ज साठी 2.72 असते.
जेव्हा तुम्ही स्टोन खरेदी करायला जाता तेव्हा तुम्हाला त्याच्या स्पेसिफिक ग्राव्हिटी बद्दल माहिती असायला पाहिजे, कारण प्रत्येक स्टोनचे परिमाण जरी एक असले तरी त्यांचे वजन किंवा घनता मात्र वेगवेगळी असते.
Colour (रंग)
मित्रांनो, काही रत्ने वेगवेगळ्या कलर मध्ये येतात. जसे की डायमंड, मेझोनाइट वगैरे. स्टोनचे रंग दोन प्रकारचे असतात. Allochromatic स्टोन आणि Idiochromatic स्टोन.
- Allochromatic स्टोन म्हणजे जे स्टोन सगळ्या कलर्स मध्ये येतात. उदा- डायमंड, मेझोनाइट, इत्यादी
- Idiochromatic स्टोन म्हणजे अशे स्टोन ज्याचा कलर एकच असतो. जे वेगवेगळ्या कलर मध्ये नसतात. उदा – पेरिडॉट, एमराल्ड, इ. जे एकाच कलर मध्ये येतात.
याशिवाय जेव्हा तुम्ही एखाद्या रत्नाची तपासणी करत असतात तेव्हा, ते तपासण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रकाश वापरणार आहात हे पाहणे देखील गरजेचे आहे, कारण जेव्हा तुम्ही दागिन्याच्या दुकानात जातात तेव्हा तुम्हाला तुम्हाला कृत्रिम प्रकाशाखाली स्टोन्स दाखवले जातील त्यामुळे हे लाइट्स रत्नाचे संपूर्ण सौंदर्य तर खुलून दाखवतील, पण जेव्हा तुम्ही ते स्टोन्स वेगळ्या लाइट मध्ये किंवा फ्लोरोसेंट लाइटमध्ये पाहता तेव्हा ते थोडे वेगळे दिसू शकतात. म्हणजेच वेगवेगळ्या लाइट्स खाली काही रत्ने पूर्णपणे वेगळ्या रंगाचे दिसतात. म्हणून शक्य असेल तर स्टोन दिवसा सूर्यप्रकाशात पाहणे उत्तम.
Dispersion (डिस्पर्शन)
मित्रांनो, डिस्पर्शन ला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, डिस्पर्शन म्हणजे एखादा स्टोन किती प्रमाणात सप्तरंगगी दिसतो हे पाहणे. म्हणजे जर तुम्ही डायमंड मधून व्हाईट कलरचा लाइट पास केला तर डायमंड सप्तरंगात लाइट्स डिस्पर्स / रिफ्लेक्ट करतो. आता हे डिस्पेर्सिन प्रत्येक स्टोन मध्ये कमी जास्त प्रमाणात असते.
उदा मेझोनाइट स्टोन, डायमंड च्या तुलनेत अडीच पट जास्त सप्तरंगी लाइट्स डिसपर्स करतो.
Crystal System (क्रिस्टल सिस्टिम)
मित्रांनो, जेवढे पण स्टोन आहेत ते कोणत्या ना कोणत्या तरी क्रिस्टल सिस्टीम शी निगडित असतात. जसे की, Hexagonal, Cubic, Tetragonal, Trigonal, Orthorhombic इत्यादी.
उदा डायमंड cubic क्रिस्टल सिस्टीमशी निगडित आहे.
जो स्टोन cubic क्रिस्टलशी निगडित आहे. असे स्टोन सिंगल रिफ्लेक्टिव्ह असतात म्हणजे त्यांच्यातून सिंगल लाइट जाते. उदा डायमंड, क्यूबिक झिरकोनिया.
व इतर क्रिस्टल सिस्टिम मधून डबल लाइट्स रिफ्लेक्ट होतात. उदाहरणार्थ, इमेराल्ड, कोरंडम , मेझोनाइट इ.
Thermal Conductivity (थर्मल कंडक्टिव्हिटी)
थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे एखादा स्टोन उष्णतेचा चांगला वाहक आहे की उष्णतेचा वाईट वाहक आहे, हे तपासणे.
म्हणजेच समजा लोखंडाला एक बाजूने गरम केले तर त्याची दुसरी बाजू पण गरम होते, म्हणजे लोखंड हे उष्णतेचे वाहक आहे. पण तेच जर लाकडाची एक बाजू गरम केली तर त्यांची दुसरी बाजू गरम होत नाही म्हणजे लाकूड हे उष्णतेचे वाहक नाही.
असेच स्टोन मध्ये सुद्धा असते. काही स्टोन हे उष्णतेचे वाहक असतात. जसे की डायमंड, मोझोनाइट इ. तर काही स्टोन उष्णतेचे वाहक नसतात. जसे की क्यूबिक झिरकोनिया.
Refractive Index (रिफ्रेक्टिव्ह इंडेक्स)
मित्रांनो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ला आरआय (RI) असे देखील म्हणतात. RI हे स्टोन ओळखण्याच्या पहिल्या टप्प्यांपैकी एक आहे. जरी काही रत्नांची रिफ्रेक्टिव्ह इंडेक्स सारखी असतात तर काहींना ओळखण्यासाठी अतिरिक्त तपासण्या कराव्या लागतात. RI मोजताना तो व्हॅक्यूम मधील प्रकाशाचा वेग आणि रत्ना मधील प्रकाशाचा वेग यामधील फरकाने मोजतात. रत्नांचा RI हा रिफ्रॅक्टोमीटर नावाच्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून मोजला जातो.
Transparency (पारदर्शकता)
मित्रांनो, पारदर्शक रत्ना मधून प्रकाश हा चांगल्या प्रमाणात जातो. तर अर्ध-पारदर्शक रत्नातून आपण फक्त काही प्रमाणात प्रकाश जाऊ शकतो, त्यामुळे फक्त काही प्रमाणात आपण पाहू शकतो, पूर्णपणे नाही. आणि अपारदर्शक रत्नातून काहीच प्रकाश जात नाही.
त्यामुळे रत्नांचे वर्णन करताना किंवा ओळख करताना त्याची पारदर्शकता पाहणेही तितकेच महत्वाचे असते.
Toughness & Durability (कडकपणा आणि टिकाऊपणा)
मित्रांनो, एखादया रत्नाचा टिकाऊपणा हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. जसे की त्या रत्नाची अंतर्गत रचना आणि त्या स्टोनचा कडकपणा. (म्हणजे कश्या प्रकारचा वार झाल्यावर तो स्टोन तुटू शकतो हे पाहणे). रत्ने खरेदी करताना टफनेस आणि दुऱ्याबिलिटी या गोष्टींचा विचार करणे खूप महत्वाचे असते.
Chemical Composition (केमिकल कंपोझिशन) / रासायनिक घटक
मित्रांनो, प्रत्येक स्टोन हा वेगवेगळ्या केमिकल एलिमेंट्स पासून बनलेला असतो. त्यामुळे स्टोन्स ओळखण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी त्या स्टोनची रासायनिक रचना किंवा तो स्टोन कशापासून बनलेला आहे हे समजणे खूप महत्वाचे ठरते. जसे की डायमंड स्टोन हा कार्बन पासून बनलेला आहे. क्यूबिक झिरकोनिया स्टोन हा झिरकोनियम ऑक्साइड पासून बनलेला आहे. तर मिझोनाइट हा स्टोन सिलिकॉन कार्बाइड पासून बनलेला आहे. अश्याच प्रकारे प्रत्येक स्टोन हा कोणत्या ना कोणत्या तरी केमिकल एलिमेंट्स पासून बनलेला असतो.
तर मित्रांनो, प्रत्येक वेगळ्या रत्नाच्या विविधतेचे सौंदर्य, रंग आणि त्यांचे तेज हे त्याच्या फिझिकल, केमिकल आणि ऑप्टिकल प्रॉपर्टीझचे परिणाम आहे. कोणत्याही रत्नाला ओळखण्यासाठी किंवा तो रत्न कुठून आला आहे आणि तो कसा तयार झाला हे समजण्यासाठी रत्न शास्त्रज्ञ या सर्व प्रॉपर्टीझ चा अभ्यास करत असतात. तसेच तुम्हालाही त्या प्रॉपर्टीझ समजाव्यात म्हणून हा आजचा लेख आपण बनवला आहे. आशा आहे की तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद !