MarathiGold (सोने)White Gold (पांढरे सोने)

व्हाईट गोल्ड माहिती | White Gold information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हाईट गोल्ड (White Gold) म्हणजेच पांढऱ्या सोन्याबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या या लेखात आपण व्हाईट गोल्ड म्हणजे काय, ते कसे तयार होते, त्याची प्युरीटी म्हणजे शुध्दता, आणि त्याचे गुण व दोष बघणार आहोत.

मित्रांनो, सणासुदीचे दिवस जवळ येतात तसे सोने चांदीची मागणी वाढत असते. तसेच लग्न समारंभ किंवा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सुद्धा सोन्याची मागणी वाढत असते. पण या पिवळ्या सोन्या सोबतच बाजारात आता पांढरे सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड सुद्धा विकले जाते. आणि या व्हाईट गोल्ड ची जगभरात खूप मागणी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शिवाय ते पिवळ्या सोन्यापेक्षा खूप जास्त महाग आहे.

White Gold information in Marathi

How White Gold Is Made ?

व्हाईट गोल्ड कसे तयार केले जाते

मित्रांनो, तुम्हाला पिवळे सोने माहीत आहेच. तसेच पांढरे सोने बनवले जाते. यात अनेक पांढऱ्या धातूंचे मिश्रण असते. जसे की पैलेडीयम, प्लॅटिनम, चांदी, निकेल यासोबतच रोडियम यासर्वांचे मिश्रण म्हणजे कोटिंग केले जाते आणि या मिश्रणाला सोन्यामध्ये एकत्र केलयास सोन्याचा पिवळा रंग नाहीसा होऊन त्याचा पांढरा रंग तयार होतो. हेच ते पांढरे सोने म्हणजे व्हाईट गोल्ड .

White Gold Purity



व्हाईट गोल्डची प्युरीटी / शुध्दता

मित्रांनो, व्हाईट गोल्डची प्युरीटी ही खूप कमी असते. व्हाईट गोल्ड तीन प्रकारे मोजले जाते.

  • एक म्हणजे 10 कॅरेट गोल्ड, हे घेतल्यास त्याची प्युरीटी फक्त 41.७ टक्के असते. बाकी सर्व इम्प्युरीटी (अशुद्धी) असतात. म्हणजे 41.7 टक्के गोल्ड असते व बाकीचे इतर धातू असतात.
  • दुसरे म्हणजे 14 कॅरेट गोल्ड, त्यामध्ये 58.3 टक्के प्युरीटी असते.
  • तिसरे म्हणजे 18 कॅरेट गोल्ड , यामध्ये 75 टक्के प्युरीटी असते.

तसे पाहिले तर 18 कॅरेट गोल्ड सर्वात चांगले मानले जाते. पण ते खूप महाग असते तसेच खूप कमकुवत पण असते. म्हणजे जेवढी जास्त प्युरीटी तेवढा तो दागिना कमकुवत असतो. म्हनून जास्त करून लोक 10 कॅरेट गोल्ड घेणे पसंत करतात, कारण ते स्वस्त पण असते आणि मजबूत (स्ट्रॉंग) पण असते.

तूम्ही जेव्हा व्हाईट गोल्ड चे दागिने घ्यायला जाल तेव्हा त्यावर तुम्हाला ते किती कॅरेटचे आहे हे लिहिलेले दिसेल. त्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा दागिना किती खरा आहे व किती कॅरेटचा आहे.

White Gold Benefits

व्हाईट गोल्डचे फायदे

मित्रांनो, व्हाईट गोल्ड चा उपयोग जास्त करून दागिने बनविण्यासाठी केला जातो, त्यातही हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये व्हाइट गोल्ड जास्त वापरले जाते. त्यात साध्य किंवा डायमंड च्या बांगड्या, अंगठ्या, चेन आणि डिझाईनर पेंडेंट यांचा समावेश होतो. तुम्ही व्हाईट गोल्ड चे मंगळसूत्र, ब्रेसलेट किंवा आर्मलेट सुद्धा बनवू शकता.

आजकाल बाजारात पिवळे आणि पांढरे सोन्याचे दागिने सुद्धा उपलब्ध आहेत. या व्हाईट गोल्ड चा उपयोग कार बनवण्यासाठी, सायकल बनवण्यासाठी तर काही लोकांनी याचा उपयोग घड्याळ बनवण्यासाठी सुद्धा केला आहे.

आज काल व्हाइट गोल्ड ची कव्हर किंवा बॉर्डर असलेले मोबाईल फोन सुद्धा बाजारात दिसून येतात. कपड्यांवर सुद्धा पांढऱ्या सोन्याची एम्ब्रोईडरी केलेली दिसते.

मित्रांनो, व्हाइट गोल्ड हे सौंदर्य उत्पादनांमध्ये सुद्धा वापरले जाते. ज्यामध्ये प्रामुख्याने बी बी क्रीम, स्किन स्क्रबर, ब्लीच, फेशियल, क्रीम यांचा समावेश होतो. हे सौंदर्य उत्पादन वापरण्या आधी एखाद्या ब्युटी एक्सपर्ट चा सल्ला अवश्‍य घ्यावा.

मित्रांनो या सौंदर्य प्रसाधन मुळे त्वचेला खूप फायदा होतो जसे की पांढरे गोल्ड आणि डायमंड यांचे मिश्रण केलेले सौंदर्य उत्पादनं वापरल्यामुळे त्वचेची रक्ताभिसरण क्रिया वाढते, ज्यामुळे त्वचा ताजी व चमकदार दिसू लागते. तसेच त्वचेची प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.

याशिवाय व्हाइट गोल्ड हे प्लॅटिनम पेक्षा अधिक स्वस्त असल्याने ते परवडण्यासारखे आहे. व्हाइट गोल्ड मध्ये इतर धातू असल्याने ते सोन्यापेक्षा जास्त मजबूत आणि टिकाऊ बनते. शिवाय त्यावर कुठल्याही प्रकारचे स्‍क्रॅचेस पडत नाहीत.

व्हाईट गोल्डचे दोष

व्हाइट गोल्ड मध्ये निकेल वापरले जाते. त्याचे प्रमाण कॅरेट नुसार कमी-जास्त होते. जितके कमी कॅरेट असेल तितके त्यात निकेलचे प्रमाण जास्त असते आणि या निकेल मुळे बऱ्याच लोकांना एलर्जी होण्याची शक्यता असते. तसेच व्हाइट गोल्ड दिसताना तर पांढरे दिसते पण कालांतराने त्याचा वापर केल्याने ते हळूहळू पिवळे पडते. त्यामुळे तुम्हाला त्याला परत पॉलिश करावे लागते.

तर मित्रांनो , अशा प्रकारे आज आपण व्हाइट गोल्ड याबद्दल माहिती बघितली. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद…